दोन नेत्यांमध्ये थेट व्यासपीठावरच तू-तू, मैं-मैं,एकदुसऱ्याला दम भरला

Between the two leaders directly on the platform, Tu-Tu, Main-Main, each other was full of breath

 

 

 

 

महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षांपासून वेगळ्या वळणावर आले आहे. महाराष्ट्रातील या बदलत्या राजकारणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदर्श राजकीय परंपरेला तडा जाणारा प्रकार संभाजीनगरमध्ये घडला आहे. दोन्ही शिवसेना पक्षातील आजी माजी खासदारांमध्ये जबरदस्त वाद झाला आहे.

 

व्यासपीठावर त्यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली. दमही भरला गेला. टिंगलही करण्यात आली. खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात हा प्रकार घडला.

 

 

दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी एकत्र आले. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना नेते आणि माजी महापौर नंदकुमार घोडीले पक्षपात करत असल्याचा आरोप संदीपान भुमरे यांनी केला.

 

त्यानंतर भर व्यासपीठावर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरु झाली. प्रोटोकॉल का पाळत नाही? असा प्रश्न संदीपान भुमरे यांनी विचारला.

 

तर चंद्रकांत खैरे यांनाही संदीपान भुमरे यांनी दम भरला. त्यानंतर संदीपान भुमरे यांच्याकडून पुस्तक आडवे लावत चंद्रकांत खैरे यांची टिंगल करण्यात आली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *