शिंदे गटाचे 25 उमेदवारांची यादी फायनल, लवकरच जाहीर होणार

The final list of 25 candidates of the Shinde group will be announced soon

 

 

 

गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची लिस्ट फायनल झाल्याचे म्हटले आहे.ही यादी आमचे नेते एकनाथ शिंदे लवकरच जाहीर करतील.

 

असं ही त्यांना म्हटलंय. ते म्हणाले की, ‘एक-दोन दिवसांमध्ये आमची सुद्धा यादी जाहीर होईल असा अंदाज आहे. लोकसभेच्या पद्धतीने जागांचा तिढा महायुतीत राहिला तसं विधानसभेत होणार नाही

 

ती काळजी महायुतीतील तिन्ही नेते घेत आहेत. यात वाद होऊ नये आणि जो विलंब लागतो. तसं होऊ नये. ज्या ठिकाणी झालेला आहे तो उमेदवार निवडून येईल

 

असे निश्चित असेल. ज्या ठिकाणी त्या पक्षाची शक्ती आहे त्या जागा लवकर जाहीर करून कामाला लावावं. त्यानुसार चौकटीत राहून उमेदवार पुढचा कामे करत असतो.’

 

‘बारामती हा अजित पवार यांचे होम ग्राउंड आहे. गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य जवळपास सव्वा लाख मतांचा होतं. लोकसभेत वेगवेगळे खोटे नेरीटिव्ह पसरवण्यात आले.

 

पण लोकसभा आणि इतर विधानसभा नगरपालिका या निवडणुका या वेगवेगळ्या असतात. पक्षांमधून व्यक्तीलाही तितकं स्थान असतं.

 

बरेच दिवस अजितदादा यांनी तिथले प्रतिनिधित्व केले आहे. साहजिकच ते बारामती मधून लढतील असा आम्हाला देखील वाटत होतं.’

 

‘शरद पवार यांच्यासमोर त्यांचा शंभर टक्के टिकावं लागेल. अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित दादा गटाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दिली आहे.’

 

‘राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच ते पुढे गेले असते पण ते कसा आहे बाबल्या रे बाबल्या असं काम चाललं आहे. हे बघा हे वाद चालणारच आहे.

 

तीन-तीन पक्ष एकत्र आले त्यामुळे हे वाद चालणारच आहे. पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते प्रयत्न करत असतात मग ते कोणतेही पक्ष असो.’

 

‘इथं जाहीरनामा द्यायचा असेल तर काँग्रेसला राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना विचारावा लागेल. उद्धव ठाकरे यांना त्यांचा जाहीरनामा जाहीर करताना राष्ट्रवादी व काँग्रेस दोघांना विचारावे लागेल. आणि त्यांचा दोघांचा अजेंडा हा एक नाहीये.’

 

 

‘देशामध्ये सगळेच मुसलमान हे अशा पद्धतीने असतात असं नाही. जे पाकिस्तान धारजेने आहेत. बांगलादेशी धारणेचे आहेत त्यांच्या बाबतीत

 

 

असे वक्तव्य करणे योग्य आहे. हे वक्तव्य करत असताना सगळेच मुसलमान देशद्रोही आहेत. असे चुकीचे आहे. असं म्हणू नये. हा माझा त्यांना सल्ला आहे.’

 

 

‘पक्ष वेगवेगळे असल्यामुळे भूमिका थोड्याफार वेगवेगळ्या राहणारच. आता तीन भाऊ असतात तर तिघांचे स्वभाव हे सारखे नसतात.

 

निवडणुकीच्या बाबतीमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देणे त्याचबरोबर सरकारने केलेली कामाचा मतदारांमध्ये प्रचार प्रसार करणे. त्यांना आम्ही हेच आवाहन केले की 58 महिने आम्ही आपल्याकरता काम केलं आहे.

 

तर दोन महिने तुम्ही आमच्या करता काम करा जेणेकरून पुढच्या 58 महिने आपल सुखकर जातील. सालदार म्हणून आम्ही

 

जनतेचे काम करत असतो. नेहमी आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचे काम करतो.’

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *