पूर्णा शहरात महिलेचा खून
Murder of a woman in Purna city

पूर्णा -शेख तौफिक
पूर्णा शहरातील रेल्वे वसाहत पाॅवर हाऊसच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावर एका ४० वर्षीय महीलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला,
अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली .
मिळालेल्या माहितीनुसार पूर्णा शहरातील विजयनगर, हरिनगर परिसराला लागुन असलेल्या रेल्वे वसाहतीतील पाॅवरहाऊच्या मागे झुडपांनी वेढलेले मोकळं मैदान आहे.
या मैदानावर एका ४० वर्षीय महीला डोक्यात तोंडावर मार दिलेल्या रक्तबंबाळ अर्धनग्न अवस्थेत मृतावस्थेत पडलेली असल्याचे परिसरातील नागरिकांना निदर्शनास आले,
घटनेची माहीती पूर्णा पोलीसांना देण्यात आली.घटनास्थळी पूर्णा पोलिस ठाण्याचे पो.नि.विलास गोबाडे,सपोनि शिंदे, फौजदार केंद्रे,जमादार, रमेश मुजमुले,
सपोऊपनि अण्णा माने,पोकाॅ.अजय माळकर बंडू राठोड, संदिप चौरे,पोकाॅ.घारगीळ ,पो.काॅ.रंगनाथ दुधाटे,पवन लांडगेवाडवा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राव आदीं पोलिस घटनास्थळी धाव घेऊन
मयत महीलेचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी तातडीने श्वास पथक ठसे, तज्ञांना प्राचारण केले.
पोलीसांनी सदर महीलेच्या ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू करताच सदरील महीला ही येथिल सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असल्याचे प्रार्थमिक दृष्टया निष्पन्न केले आहे.
तीला कोणी व कशासाठी मारले याचा तपास पोलीसांनी सुरू केला असून, मारेक-यांचा शोधासाठी पथकं रवाना केली असल्याचे कळवले आहे.घटनास्थळी जिल्ह्यातील
सहा.पोलीस अधिक्षक जिवन बेनिवाल, स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पो.नि अशोक घोरबांड, केंद्रीय गुप्तचर विभागाचे वाघमारे,आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली
घटनेप्रकरणी वृत्त लिही पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.पूर्णा पोलिस तपास करीत आहेत.