लोकसभेच्या जागेवरून आता शिंदे गट अजित पवारांच्या विरोधात आक्रमक

Now the Shinde group is aggressive against Ajit Pawar from the Lok Sabha seats ​

 

 

 

 

कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मंथन शिबिर पार पडले. या कार्यक्रमातून अजित पवार यांनी बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या चार लोकसभेच्या जागांवर दावा सांगत शरद पवारगटाविरुद्ध दंड थोपटले.

 

 

मात्र अजित पवार यांच्या या दाव्यानंतर महायुतीतच संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. सातारा लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचाच असून तो आम्हालाच मिळायलाच हवा.. अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर साता-यातून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीहा मतदारसंघ शिवसेनेच्याच हक्काचा असून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मतांनी निवडुन येईल असा दावा केला आहे.

 

 

शिवसेनेचे दोन आमदार या ठिकाणी असुन इतर भाजपचे आमदारसुद्धासोबत असल्यानं या ठिकाणी शिवसेनेला पोषक वातावरण आहे.

 

 

त्यामुळे शिवसेना शिंदे गट सातारा लोकसभा मतदार संघासाठी आग्रही आहे. थोडक्यात आगामी काळात जागा वाटपावरुन महायुतीतच मोठं रणकंदन होणार यात शंका नाही.

 

 

 

कर्जतमधील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मार्च २०२४ च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूकांची घोषणा होईल. तसेच राज्यामध्ये चार लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

 

 

यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघासह, सातारा, अमोल कोल्हेंचा शिरुर, आणि रायगड या जागांचा समावेश आहे. अजित पवारांच्या या घोषणेने राज्यात पवार विरुद्ध पवार असा थेट लढा पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *