भाजपच्या महिला आमदार शरद पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश करणार ?

Will BJP's women MLAs join Sharad Pawar's Nationalism?

 

 

 

विधानसभा निवडणूक ही फारच रंगतदार होताना दिसणार आहे. आतापर्यंत काका-पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणाऱ्या विधानसभेत आता मात्र बाप लेक,

 

दीर -भावजय अशा लढाईही पाहायला मिळणार आहेत. त्यातच आता पुणे विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत.

 

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चिंचवड विधानसभेच्या

 

विद्यमान भाजप आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावर अश्विनी जगताप यांनी भाष्य केले आहे.

 

अश्विनी जगताप त्यांना शरद पवार गटात प्रवेश करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अश्विनी जगताप यांनी माझ्याबद्दल होणाऱ्या या चर्चा निरर्थक आहे. दोन दिवस माझी प्रकृती व्यवस्थित नसल्याने मी घरीच आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

 

“गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. अश्विनी जगताप या काही माजी नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

 

आता यावर अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चा निरर्थक असून भाजपला बदनाम आणि जगताप कुटुंबियांना त्रास द्यायचा हाच हेतू आहे.

 

दोन दिवस माझी प्रकृती व्यवस्थित नसल्याने मी घरीच आहे. मी शरद पवार गटात जाणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. हे विरोधकांचे काम आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली.

 

 

“माझे दीर शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली, तर त्यांना बहुमताने निवडून आण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. त्यांचा प्रचार करण्यासाठीही मी स्वत: रस्त्यावर उतरेन.

 

मी शरद पवार गटात जाणार असल्याची अफवा पसरली आहे. पण हे विरोधकांचे काम आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी पक्ष निष्ठा दाखवलेली आहे.

 

 

आम्ही त्यावर चालणारी माणसं आहोत. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, ज्याची उमेदवारी देईल, त्याच काम करायचं असं मी ठरवलं आहे”, असेही अश्विनी जगताप म्हणाल्या.

 

 

मला पक्ष डावलेलं असं वाटत नाही. शंकर जगताप आणि माझ्यात कोणताही वाद नाही. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे आता पक्ष आदेश देईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही अश्विनी जगताप यांनी म्हटले.

 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चिंचवड विधानसभेत दीर विरुद्ध भावजय असे लढत पाहायला मिळत आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या आमदार आहेत.

 

मात्र वहिनींच्या मतदारसंघावर आता थेट दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे. काही ही झालं तरी मी चिंचवड विधानसभेतून लढणार, असा ठाम निश्चय शंकर जगतापांनी केला होता.

 

तर दुसरीकडे अश्विनी जगताप यांनीही या मतदारसंघावर दावा केला होता. यामुळे त्यांच्यात वाद पाहायला मिळाला.

 

 

याचदरम्यान अश्विनी जगताप यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. त्यामुळे त्या लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील असे बोललं जात होतं.

 

मात्र काही दिवसांपूर्वी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि दीर शंकर जगताप यांच्यात चिंचवड विधानसभेवरून समझोता झाला. त्यानंतर अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचे बोललं जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *