राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम संपन्न

National Nutrition Maha Program concluded

 

 

 

महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने मोजे धनगर टाकळी येथील अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 

याच कार्यक्रमात गरोदर महिलांनी गरोदरपणात घेण्याच्या काळजी विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली जेवनात कोणत्या प्रकारचा आहार द्यावा याबाबत आहार संबंधीच्या वस्तूचे प्रदर्शन करण्यात आले होते

 

तर टाकाऊ वस्तु पासून ही वस्तू तयार करून त्यावर अक्षर, लेखन इत्यादी साकारण्यात आली होती अतिशय सुंदर हा उपक्रम यावेळी धनगर टाकळी येथे घेण्यात आला.

 

घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच मीराताई सेनाजी माटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री गिरडकर बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा काळे पंचायत समिती सदस्य सुनिता साखरे

 

डॉक्टर ताल्डे डॉक्टर जोशी श्री नरावाड प्रयवेशिका व्ही यु भालेराव यु यु आळसे ,उपसरपंच शेख मगदूम शेख चांद मनीषा ढगे सह आदींची उपस्थित होती.

 

तर याच कार्यक्रमात एक पेड मा के नाम या कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवून अंगणवाडीत दोन झाडे लावण्यात आली. हा उपक्रम ही राबवण्यात आला अतिशय सुंदर हा उपक्रम होता

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रा कुलकर्णी, नूर बेगम सय्यद ,संध्या गायकवाड ,सुशीला पांचाळ, रेखा ढगे रंजना कोकरे, नीता जोंधळे सुकेशनी ढगे सुनिता पुंजारे जगन्नाथ साखरे तुराब सह सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले

 

 

यावेळी गरोदर मतांसह आदी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता तर लहान बालकांनी आपली कला दाखवत सगळ्यांचे मने जिंकली

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *