राजर्षी शाहू विद्यालयातील रितेश खंदारे याची कुस्ती स्पर्धेत यश
Ritesh Khandare's success in wrestling competition of Yash Rajarshi Shahu Vidyalaya

पुर्णा-शेख तौफिक
संचालनालय पुणे व परभणी जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत पुर्णा तालुक्यातील
आहेरवाडीतील राजर्षी शाहू विद्यालयातील रितेश खंदारे याने कुस्ती स्पर्धेत बाजी मारून शाळेला विजय प्राप्त करून दिला.
परभणी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत रितेश दत्तराव खंदारे याने 51 वजन किलो गटात जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला.
रितेशची विभागीय कुस्तीस्पर्धेसाठी निवड झाली असून विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जगदंबा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे ,
संस्थेच्या सचिव प्राचार्या रजनी ताई मोरे, शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव शिक्षक बी.एन बगाटे, गंगाधर सोनटक्के, प्रा.उत्तम मोरे
मार्गदर्शक शिक्षक पारवे बी पी,केशवराव लोखंडे,प्रा.माधवराव शेजुळ,,वस्ताद अण्णा डिगोळे,प्रकाश महाजन,प्रा सतीश भालेराव,सुनिल पारवे ,
देवानंद भारती, दत्ता गंगोञे,बबन पारवे प्रा. प्रदिप कदम संदिप विश्वासराव, संत्यम खंडागळे व,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.