परभणी विधानसभेतून नवाब मालिकांना उमेदवारी ?
Candidacy for Nawab Series from Parbhani Legislative Assembly?
डॉ.मुजीब शेख/9421082784
परभणी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून परभणीचे माजी पालकमंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघात महाविकास आघाडीचे बंडु जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
आता विधानसभा निवडणुकीतही जवळपास तीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.
ही बाब नजरेसमोर ठेवून महायुतीकडून राजकीय व्हीवरचना करण्यात येत असून नवाब मलिक यांना परभणी विधानसभेच्या रिंगणात उतरविणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील दोन टर्म पासून आमदार आहेत, शिवसेनेत बंडखोरी झाली तरीही पाटील ठाकरे गटाकडेच राहिले,
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीमध्ये सीटिंग- गेटिंग या फार्मूल्यानुसार शिवसेना ठाकरे गटाच्याच वाट्याला जाणार आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून राहुल पाटीलच हे पुन्हा निवडणूक रिंगणात असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे
राहुल पाटील यांच्या विरोधात कोण तुल्यबळ उमेदवार द्यावा याबाबत महायुतीमध्ये चाचपणी सुरू आहे, ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करत आहेत,
परंतु त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही, भाजपकडे आनंद भरोसे एक चेहरा आहेत ,परंतु यापूर्वी भरोसे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली त्यात त्यांचा दारुण पराभव झाला.
राहुल पाटील यांच्यासमोर ते टिकाव धरू शकणार नाहीत, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ,एमआयएम, वंचित आघाडी आणि अपक्षांची फौज राहुल पाटील यांच्यासमोर उभी होती
परंतु त्यांचा टिकाव लागला नाही, काँग्रेस पक्षाचा उमेदवार तसेच इतर पक्षाकडून मुस्लिम उमेदवार असतानाही मुस्लिम समाजाची काही प्रमाणात मते शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांना मिळाली होती
आता तर आघाडीचे उमेदवार म्हणून राहुल पाटील हे रिंगणात राहतील त्यामुळे मोठ्या मताधिकाने त्यांचा विजय होईल असे चित्र सध्या तरी मतदारसंघात आहे
परभणी विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या जवळपास 40 ते 43 टक्के मतदान हे मुस्लिम मतदार आहेत आणि
त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अजित पवार गटाकडून नवाब मालिकांना उमेदवारी देण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे
मलिक यांना उमेदवारी दिल्यास ते मुस्लिम मतांमध्ये डेंट मारू शकतील आणि राहुल पाटील यांचा पराभव होईल असे नियोजन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते ,जवळपास दोन वर्षाच्या काळात मलिक यांचा शहर व जिल्ह्यात संपर्क होता
,त्यांच्या संपर्काचा फायदा त्यांना विधानसभा उमेदवार म्हणून होऊ शकतो असा असा कयास अजित पवार यांच्याकडून लावण्यात येत आहे
अजित पवार हे निवडणुकीत महायुती पासून फारकत घेऊन स्वतंत्ररीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचीही चर्चा जोरात आहे, अशा परिस्थितीत जर निवडणुकीत पवार स्वतंत्र लढले तर
नवाब मलिक हे अजित पवारांच्या घड्याळाचे उमेदवार असतील तर महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील असतील अशा स्थितीत मुस्लिम मतांची विभागणी
किंवा एक एकगठ्ठा मते नवाब मलिक यांच्या झोळीत पडल्यास भाजप उमेदवाराचा विजय सहज शक्य होईल अशी व्हीवरचना
सध्या सध्या भाजपकडून करण्यात येत असून मलिकांची उमेदवारी त्याचाच एक भाग असू शकते असेहि राजकीय जाणकारांचे मत आहे
कारण यापूर्वीही अशा प्रकारचे प्रयोग परभणी विधानसभा मतदारसंघात झालेले असून त्यात भाजप शिवसेना मोठा फायदा झालेला आहे.
परंतु आता परभणीचे मुस्लिम मतदार इतिहासातून बरेच काही शिकले आहेत ,त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकांची
संभाव्य उमेदवारी भाजप उमेदवारांच्या मदतीसाठी आणि भाजप उमेदवाराचा विजय सुकर करण्यासाठी राहणार ? याबद्दलची चर्चा सध्या होताना दिसत आहे