राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती? शरद पवार यांचं सर्वात मोठं राजकीय भाष्य

Repeat Lok Sabha in the state? Sharad Pawar's biggest political commentary

 

 

 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाकि‍तांकडे सर्वांचेच लक्ष्य असते. यापूर्वी त्यांनी लोकसभेला महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल असं भाकित केलं होतं.

 

निकालानंतरचं चित्र राज्यासमोर आहे. आता ही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पवार यांनी महायुतीवर कोरडे ओढले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारण्याचा दावा केला. काय म्हणाले शरद पवार?

 

मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला.

 

आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे.

 

 

महिलांचा सन्मान करायचं ठरवलं तर आम्ही त्याचं समर्थन करतो. फक्त ही योजना कायमची आहे की तात्पुरती आहे. हे सांगावं. बजेट मांडला जातो.

 

त्यातील एकही तरतूद बजेटमध्ये नाही. हा निवडणुकीसाठीचा उद्योग आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. ही एक प्रकारे भगिनींची फसवणूक करण्याचं पाऊल आहे.

 

 

लाडकी बहिणीचं स्वरुप, त्याचा अभ्यास करावा लागेल. बजेटची तरतूद याची माहिती घ्यावी लागेल. जर योग्य असेल तर चालू ठेवायला हरकत नाही.

 

पण ती तात्पुरती होणार नाही याची खात्री आमची झाली पाहिजे. ज्यांना लाभ होणार आहे, त्यांनाही वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.

 

 

महाविकास आघाडीलाआगामी विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी मिळण्याचा विश्वास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

 

दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दोन महिने थांबा, आमचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीला

 

आता वातावरण बदलल्याचा मोठा फायदा होईल असे वाटत आहे. लोकसभेचा कलंक पुसणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *