गॅस सिलिंडरच्या दरात एकाच दिवसात 993 रुपयांची वाढ; राहुल गांधीं

Gas Cylinder Prices Rise by ₹993 in a Single Day: Rahul Gandhi

 

 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत एकाच दिवसात ९९३ रुपयांची मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देत, राहुल गांधींनी याला ‘निवडणुकीचे बिल’ असे संबोधले आहे.

 

“निवडणुका संपल्यानंतर महागाईचा चटका बसेल, असा इशारा मी आधीच दिला होता आणि आज तेच घडताना दिसत आहे,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे, पण सरकारला त्याची पर्वा नाही,” अशी टीका त्यांनी केली.

ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दंड थोपटले

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण १,३८० रुपयांची वाढ झाली आहे.

 

गेल्या तीन महिन्यांचा विचार केल्यास ही दरवाढ तब्बल ८१ टक्के इतकी आहे. एकाच दिवसात ९९३ रुपयांनी किंमत वाढणे ही आजवरची मोठी वाढ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड नाही; तर या पैकी एक पुरावा

या दरवाढीचा थेट परिणाम चहाच्या टपऱ्या, छोटे ढाबे, हॉटेल, बेकरी आणि मिठाईच्या दुकाने चालवणाऱ्या छोट्या व्यापारांवर होणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातील अन्नही महागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असताना सरकारने नफा कमावला आणि आता दरवाढीचे ओझे जनतेवर टाकले जात आहे,

इराणचा गंभीर इशारा, ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक

असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेला दिलासा आता संपला असून महागाईचे दिवस सुरू झाले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली आहे.

 

या नव्या दरवाढीमुळे व्यावसायिक वर्गात चिंतेचे वातावरण असून, काँग्रेस आता या मुद्द्यावरून देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

विधान परिषदेवर बिनविरोध होताच झिशान सिद्धीकी यांची पहिली मोठी प्रतिक्रिया

 

दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने राहुल गांधींचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. जागतिक परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे काही प्रमाणात किमती वाढल्या असल्या तरी,

 

सरकार गरिबांना सबसिडीच्या माध्यमातून दिलासा देत असल्याचे भाजप प्रवक्त्यांनी म्हटले आहे. मात्र, राहुल गांधींनी मांडलेली ८१ टक्क्यांची आकडेवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, गृहिणींमध्येही यावरून तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द,

 

Related Articles