चार जागांवर,महायुतीत भलताच पेच; शिंदे कोंडीत

In four seats, the grand coalition is in trouble; Shinde in dilemma

 

 

 

 

केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल.

 

 

 

पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान होईल.

 

 

 

निवडणूक आयोगानं संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला असला तरीही महायुती, महाविकास आघाडीला जागावाटप जाहीर करता आलेलं नाही.

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री दीड आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

 

 

 

 

त्यानंतर मागील आठवडाभर जागावाटपासाठी बैठका झाल्या. पण महायुतीच्या जागावाटपाचा पेच कामय राहिला. दुसरीकडे

 

 

 

 

भाजपनं मात्र २० जागांवर उमेदवार जाहीर केले. मागील निवडणुकीत पक्षानं २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २० जागांवर भाजपनं उमेदवार दिले आहेत.

 

 

 

 

भाजप आणि शिवसेनेत चार जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे या चारही जागा मागील निवडणुकीत शिवसेनेनं जिंकल्या होत्या.

 

 

 

या मतदारसंघांच्या खासदारांनी पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत असलेल्या १३ जणांचं तिकिट कापून नका.

 

 

 

 

त्यांचे मतदारसंघ सेनेसाठी सोडा, अशी विनंती शिंदेंनी शहांकडे केली होती. पण त्यानंतरही भाजप सेनेनं जिंकलेल्या ४ जागांसाठी आग्रही आहे.

 

 

 

 

रामटेक, यवतमाळ-वाशिम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघांवर भाजपनं दावा सांगितला आहे. या चारही मतदारसंघांमध्ये सेनेचे खासदार असून ते शिंदेंसोबत आहेत.

 

 

 

पण भाजपला या जागा हव्या आहेत. या जागा भाजपला सोडल्यास शिंदेंसाठी ती मोठी नामुष्की असेल. शिंदेंना त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांच्या जागाही टिकवता आल्या नाहीत असा संदेश यातून जाऊ शकतो.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *