शरद पवार यांच्या राष्ट्र्वादीत नाराज कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र ;पाहा काय घडले कारण?
Resignation session of disgruntled activists of Sharad Pawar's Nationalism; see what happened because?
दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बनले. एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिला अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले,
असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
त्यानंतर आता माजी आमदार संतोष चौधरी बंडाच्या तयारी आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.
रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम पाटील यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिला. महायुतीच्या रक्षा खडसे उमेदवार आहेत. यामुळे रावेरमध्ये दोघांमध्ये ही सरळ लढत होणार आहे.
परंतु आता भुसावळचे माजी आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष चौधरी यांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षात नाराजी वाढल्याचे चित्र आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी दोन महिन्यांत हातातील कमळ सोडले आणि तुतारी वाजवली.
भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेल्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
त्यानंतर भुसावळ, रावेर, वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता
ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे चित्र आहे.
दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता आहे.