रामदेव बाबाला सुप्रीम कोर्टाने फटकारले

Ramdev Baba was reprimanded by the Supreme Court

 

 

 

 

 

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी संदर्भात काल सुप्रीम कोर्टात सुनावणी होती पण जाहिरातीच्या मुद्द्यावरुन पुन्हा सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे.

 

 

 

उत्तराखंड सरकारने १४ उत्पादनावर बंदी घातली आहे त्यानंतर उत्पादनांच्या जाहिरातीवर सुद्धा कोर्टाने बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

 

 

 

काल सुप्रीम कोर्टात याच प्रकरणावर सुनावणी पार पडली यामध्ये पतंजली कंपनीने सुप्रीम कोर्टात सांगितले की १४ उत्पादनांची विक्री थांबवण्यात आली आहे.

 

 

 

उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या १४ उत्पादनाचे लायसन्स रद्द केले होते. यानंतर पतंजलीने ५ हजार ६०५ दुकाने बंद केलीत अशी माहिती सुप्रीम कोर्टात दिली आहे. यानंतर कोर्टाकडून पतंजली कंपनीला जाहिरातीबद्दल विचारण्यात आले.

 

 

 

 

यावर कंपनीने आपण टीव्हीवरुन १४ उत्पादनांच्या जाहिराती हटवल्या आहेत असे सांगितले पण सोशल मीडियावरील जाहिरातीचे काय असा सवाल कोर्टाने पतंजली कंपनीला विचारला,

 

 

 

 

यावर पतंजलीच्या वकीलाने आम्ही संबधित सर्व जाहिराती विभागांना सूचना दिली अशी कोर्टात माहिती दिली. यानंतर कोर्टाने वकिलाचा युक्तीवाद फेटाळत कोर्टाने पतंजली कंपनीला दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे,

 

 

 

यामध्ये कंपनीला एक अधिकृत प्रतिज्ञाप्रत करुन कोर्टात सादर करायचे आहे ज्यामध्ये सोशल मीडियावरील सर्व जाहिराती हटवल्या गेल्या आहेत

 

 

 

यासह टीव्हीवरील सर्व जाहिराती काढून टाकल्या आहेत याची माहिती सादर करायची आहे, तसेच पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.

 

 

इंडिया मेडिकल असोसिएशन यांच्याद्वारा दाखल केलेल्या याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. यामध्ये इंडिया मेडिकल असोसिएशनने लसीकरण अभियान

 

 

आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीला बाबा रामदेव यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. उत्तराखंड सरकारने सांगितले की पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मेसीच्या १४ उत्पादकांवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे

 

 

 

 

इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने खोट्या जाहिरात प्रकरणी योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांना माफी मागण्यास सांगितले होते तसेच पतंजलीवर अवमान नोटीसाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *