आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्णा येथे रस्ता रोको आंदोलन

Road stop movement at Purna to demand reservation

 

 

पूर्णा -शेख तौफिक

 

शासनाने धनगर समाजाला एसटीतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांनी पूर्णा येथून जाणाऱ्या नांदेड- रस्त्यावरील

 

ताडकळस टी पॉइंट वर जोरदार निदर्शने करत महामार्ग क्र. 61 रोखुनी धरला यावेळी सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलन मुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

 

महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड जमात अस्तित्वातच नसून धनगर ऐवजी ते धनगर आहेत असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे.बोगस धनगडाचे बनावट दाखले रद्द करावे,

 

त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा, तो राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा. धनगर जमात राज्यात अस्तित्वात नसून

 

अनुसूचित जमातीच्या यादी 36 नंबरला धनगर ऐवजी धनगर असे गृहीत धरून जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावी,

 

आदिवासी जमातीच्या 79 टक्के आरक्षणाला धक्का लागू दे न देता धनगरांना एसटी चे आरक्षण द्यावे, अशा मागण्यासाठी सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पूर्ण येथील ताडकळस टी पॉइंट येथे धनगर समाज बांधवांनी भव्य रस्ता रोको आंदोलन केले

 

दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली .सुमारे अर्धा ते पाऊण तास नांदेड नगर महामार्ग क्रमांक 61 रोखून धरला.

 

यानंतर समाज बांधवांच्या वतीने प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले निवेदन स्वीकारण्यासाठी नाही तहसीलदार प्रशांत थारकर,

 

पोलीस निरीक्षक विलास घोबाडे रास्ता रोको च्या ठिकाणी उपस्थित होते प्रसंगी प्रसंगी रास्ता रोको च्या पार्श्वभूमीवर पूर्ण पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *