मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पूर्णेत कडकडीत बंद
Strict shutdown in Purne to demand Maratha reservation
पूर्णा/ शेख तौफिक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी ६ दिवसांपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
शासन उपोषणावर तोडगा काढत नाही.दरम्यान त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांच्या समर्थनार्थ रविवार २२ सप्टेंबर रोजी येथिल समाज बांधवांनी पूर्णा बंद आवाहन केल्यानंतर व्यापा-यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला .
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कायम स्वरुपी आरक्षण मिळावे यासाठी मागील वर्षापासून आंदोलन सुरू केले आहे.
शासन मराठ्यांच्या आरक्षणाचा तोडगा काढत नाही आश्वासनावर आश्वासन देत आरक्षणाचा विषयावर टोलवाटोलवी करत आहे.
म्हुणन पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मागील ६ दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत . अन्न त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाज बांधवांनी राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या उपोषणाची तात्काळ घ्यावी या मागणीसाठी रविवार २२ रोजी पूर्णा बंदची हाक दिली होती .
त्यानुसार शहर व तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत शांततेत बंद पाळण्यात आला.बंद दरम्यान पोलीसांनी ठिक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.