लाडकी बहीण योजनेचे काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार

Refusal of Anganwadi workers to work on Ladaki Baheen Yojana

 

 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी म्हटलं आहे.

 

केवळ ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करू, पण ऑनलाईन अर्ज भरणार नाही अशी भूमिका सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी घेतल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.

 

 

सोलापूरसह राज्यात लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्याचं समोर आलंय

 

 

तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे. अशात आता सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम न करण्याची भूमिका घेतली आहे. .

 

मानधनवाढीसाठी सोलापूर जिल्हा परिषदिसमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं. महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?

 

असा सवाल यावेळी विचारण्यात आला. कोणीतीही योजना आली की तिचे काम अंगणवाडी सेविकांना दिले जाते, मात्र मागील अनेक

 

महिन्यांपासून मानधन वाढीसाठी आंदोलन सुरु असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी तक्रार अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे.

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही.

 

तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

 

 

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

 

अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

 

घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

 

 

कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)

 

कोणती कागदपत्रं लागणार?
आधारकार्ड

 

रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला

 

रहिवासी दाखला
बँक पासबुक

 

अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

 

लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *