मुंबईतील हे 9 मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीचा फोडणार घाम ?
Will these 9 constituencies in Mumbai break the sweat of the Shiv Sena-BJP alliance?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याची चित्र आहे.
राज्यातील काही जागांवर शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारानी तयारी सुरु केली आहे. नुसती तयारीच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते
आणि इच्छुक उमेदवार आतापासूनमतदार संघावर आपला दावा असल्याचे सांगू लागलेत. राज्यातील असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद होऊ शकतात.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या मतदारसंघांचे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत. मात्र आता त्यांच्या या मतदारसंघावर भाजपने देखील डोळा ठेवलाय.
त्यांच्या विरोधात भाजपच्या राजन तेली यांनी तयारी सुरु केली असून, तळकोकणात भावी आमदार म्हणून देखील त्यांचे बॅनर लावण्यात आले होते.
एवढेच नाही तर ते सातत्याने दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले असून, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ते मतदारसंघात काम करताना पहायला मिळत आहेत.
माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम या मतदारसंघांचे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांच्याच विरोधात भाजपच्या केदार साठे यांनी तयारी सुरु केलीय.
केदार साठे यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे रामदाम कदम हे भाजप आणि विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज असून, नुकतीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मुरजी पटेल यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाले आहेत.
त्यानंतर मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरादार तयारी सुरु केलीय. मतदारसंघात बैठका, विविध कार्यक्रम घेत ते मतदारांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
नुकताच अंधेरी येथे लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मात्र याच मतदार संघात आता एन्ट्री केलीय ती शिवसेनेमध्ये नुकताच
प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यांनी. स्वीकृती शर्मा या प्रदीप शर्मा यांच्या पत्नी असून, त्यांनी देखील मतदारसंघात फिरायला सुरुवात केलीय. नुकतंच त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते.
2009 पासून या मतदारसंघांचे नेतृत्व शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेले रवींद्र वायकर करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला असून,
आता या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी उमेदवार असतील असे बोलले जात आहे. तशी तयारी देखील मनीषा वायकर यांनी सुरु केलीय.
मात्र याच मतदारसंघातून भाजपने देखील तयारी सुरु केली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि पंकज यादव
या दोन इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केलीय. या आधी उज्वला मोडक यांनी रवींद्र वायकर यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान दिले होते.
शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र याच मतदारसंघातून भाजपने देखील चाचपणी सुरु केलीय.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघांचे नेतृत्व केलेले विधानपरिषदचे आमदार प्रवीण दरेकर देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत.
त्यांनी मतदारसंघात तशी तयारी देखील सुरु केली आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा मतदारापर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
या मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटाचे प्रकाश फातर्फेकर असून, महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केलेला आहे.
तर दुसरीकडे भाजप देखील या मतदारसंघासाठी आग्रही आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि तुकाराम काते इच्छुक असून, भाजपकडून प्रसाद लाड देखील तयारीला लागलेत.
पालघर विधानसभा मतदारसंघांचे आमदार शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आहेत. मात्र भाजपने आतापासून या मतदारसंघावर दावा करायला सुरुवात केलीय.
लोकसभेचे तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना पक्षाने या मतदारसंघातून तयारी करायला सांगितल्याची माहिती आहे.
त्यामुळे राजेंद्र गावित यांनी तयारी देखील सुरु केलीय. खासदार राहिलेले राजेंद्र गावित सध्या पालघर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसलेत.
मुरबाड मतदार संघातून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी तीन वेळा विजय प्राप्त केला आहे. विजयाची हॅट्ट्रिक केलेले किसन कथोरे यांच्या मुरबाड मतदार संघातच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेने सुरू केला आहे.
शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे हे या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारी देखील सुरु केलीय. मुरबाड मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद देखील मोठी असल्याने हा मतदारसंघ शिंदेसेनेला सोडावा, अशी मागणी म्हात्रे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे
कल्याण पूर्वच्या जागेवर भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. पण शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी पोलिस स्थानकात गोळीबार केला होता.
त्यानंतर ते सध्या तुरुंगात आहेत. कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. काही महिन्या पूर्वी ‘नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व’ असे बॅनर लावण्यात आले होते.