सलमानचा बॉडीगार्ड शेराने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची कार

Salman's bodyguard Shera bought a car worth crores of rupees

 

 

 

 

बॉलिवूड इंडस्ट्रीतला ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याच्या इतकाच त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील लोकप्रिय आहे. सलमानप्रमाणेच शेराचाही खास चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक असतात.

 

आता सलमान खानची सावली असलेल्या या शेरानं कोट्यवधींची कार खरेदी केली आहे. अनेक अभिनेत्यांकडेही नसेल इतकी महागडी कार त्यानं घेतल्यानं आता चर्चा होते.

 

 

गेल्या काही महिन्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी महागड्या कार खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. पण आता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा देखील मागे नाहीये, त्यानं कोट्यवधींची कार खरेदी केली आहे.

 

 

शेराने नुकतीच रेंज रोव्हर स्पोर्ट्स ही कार खरेदी केली आहे. कार घरी आणल्यानंतर शेरानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

 

कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं की, देवाच्या आशीर्वादानं आमच्या घरात एक नवीन सदस्य आलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो.

 

असे हॅशटॅग्जही त्यानं दिले आहेत.शेरानं नवीन कारचे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

 

शेरानं खरेदी केलेल्या या रेंज रोव्हर अलिशान कारची किंमत तब्बल १.४ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

 

शेराचं खरं नाव हे गुरमीत सिंह जॉली असं आहे. तो १९९५ पासून सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतोय. चांगल्या वाईट काळात शेरा त्याच्या सोबत असतो.

 

इतकंच नाही तर त्यानं ‘टाइगर सिक्यॉरिटी’ ही कंपनी देखील सुरू केली आहे. तर २०१७ मध्ये हॉलिवूड गायक जस्टिन बीबर जेव्हा कॉन्सर्टसाठी भारतात आला होता, तेव्हा शेरा त्याचा बॉडीगार्ड होता.

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सीबाहेर चाहत्यांची गर्दी, सलमान खाननं आभार मानले,सलमानचा बॉडीगार्ड असलेल्या शेराला तब्बल १५ ते २० लाख रुपये महिना पगार असल्याचं म्हटलं जातं.

 

 

सलमान आणि शेरामध्ये खास मैत्री आहे. सलमान त्याला कुटुंबाचा भाग मानतो.तर शेरा त्याला मालिक असं म्हणतो. इतकंच नाही तर,

 

सलमाननं त्याचा एक सुपरहिट सिनेमा शेराला डेडिकेट केला होता. इंडस्ट्रीमध्ये आपल्या बॉडीगार्डला सिनेमा अर्पण करणारा सलमान हा पहिलाच अभिनेता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *