Nanded News;सापळा रचून 14 लाखांचा बोगस खत जप्त

Nanded News;Fake fertilizer worth Rs 14 lakhs seized after setting a trap

 

 

 

पेरणीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे शेतकऱ्यांना लुटणारे लुटारू आपली तयारी करीत आहेतबोगस बी,बियाणे खताच्या माध्यमातून बळीराजाला लुटण्याचे प्रकार दरवर्षीच होत असतात

 

सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाळा सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत .यावर्षी पाऊस पहिल्या टप्प्यात चांगला पडेल त्यामुळे पेरण्या लवकर करण्याची शेतकरी लगबग करत आहेत

 

किनवट तालुक्यात विना परवाना बोगस खताची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने ही कारवाई करण्यात आली असून, यात 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत खताचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.

हे हि वाचापरभणी जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु;बँकेतून २६ हजार लांबवले

तील सिमावर्ती भागातील गावात विना बिल खताची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला मिळताच दि. 22 मे गुरुवार रोजी

 

शिवणी परिसरात सापळा रचत टि एस यु इ 6422 क्रमाकांचा टेम्पो श्री कृष्ण मंदिरा जवळ पकडून या गाडीची चौकशी केली असता विना बिल खताची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

 

सदरील गाडी ताब्यात घेऊन कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी इस्लापुर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या फिर्यादी वरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे हि वाचा;राज्यातील 22 पोलीस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या;पाहा यादी

सदरील टेम्पोची किंमत 14 लाख व खताची किंमत 64 हजार 422 रु. असे मिळून 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेलंगाणा राज्यातून दरवर्षी विना परवाना विनाबिले खते घेऊन येऊन ईस्लापूर,

 

शिवणी परिसरातील अतिदुर्गम भागातील वाडी, तांडे, यासह विविध गावात दरवर्षी खते विकण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असून या बाबत गेल्या वर्षी देखील मोठी कारवाई दि. 30 मे 2024 रोजी करण्यात आली होती.

हे हि वाचा;pune Crime News;वैष्णवी हगवणे प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

हा सर्व प्रकार या भागांमध्ये दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी  वर्गातून विचारला जात आहे.

 

त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या बाबत ताकीत दिली पाहिजे अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

 

सदरील घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार अतिरिक्त पोलिस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि उमेश भोसले पोलिस उप निरीक्षक अतुल डाके पोका ओम डिडेवार हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *