भाजपविरोधात पहिले बंड मराठवाड्यातुन ?;एकनाथ शिंदेंचा शिलेदार बंडाच्या तयारीत

First rebellion against BJP from Marathwada?; Eknath Shinde's Shiledar in preparation for rebellion

 

 

 

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची यादी जाहीर होताच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

 

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कधीकाळी सावलीसारखे राहणारे शिलेदार बंडाच्या तयारीत आहेत. नांदेडमधील मुखेडमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आव्हान देणार आहे. यामुळे महायुतीत हा मिठाचा खडा पडणार आहे.

 

नांदेड जिल्हयातील मुखेड विधानसभा मतदार संघासाठी भाजपाने विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी केली.

 

मात्र त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव राहिलेले बालाजी खतगावकर यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यांनी कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली.

 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बालाजी खतगावकर मुखेड मतदार संघात प्रचार करत होते. शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.

 

मात्र मुखेडची जागा भाजपाची असल्याने तिथे भाजपाने उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बालाजी खतगावकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. आता माघार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

 

मुखेडमध्ये भाजप उमेदवाराविरोधात सामना रंगणार आहे. त्यासंदर्भात बोलताना बालाजी खतगावकर म्हणाले, या लढतीशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही.

 

निवडणूक लढने हा माझा मूलभूत अधिकार आहे. त्यानुसार अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता माघार घेणार नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *