FB म्हणजे फुकटचा बाबुराव, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
FB means free Baburao, Eknath Shinde's attack on Uddhav Thackeray

खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत.
फक्त थोडी थोडी परिस्थिती सुधारु द्या. कर्जमाफी असो किंवा काही घोषणा, त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यांनी फेसबुक live करुन फेक नरेटीव पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत, असा टोला एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मी देखील fb म्हणजे फेवरेट भाऊ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते.
सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शहाजीबापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. एखाद्या मॅचमध्ये हरले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही. टायगर अभी जिंदा है.
बापूंना मोकळे सोडणार नाही. बापू मोकळा ढाकळा माणूस असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही उठाव केला तेव्हा सारेजण तणावात होते, पण बापू विनोद करुन वातावरण तणावमुक्त करायचे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
काय झाडी या डायलॉगमुळं आसामचे पर्यटन खूप वाढले आहे. आता तर बिल्डर देखील त्यांच्या जाहिरातीत बापूचा डायलॉग टाकताना दिसत आहेत. बापूंना हे माहीत नसावे नाहीतर रॉयल्टी मागितली असती असा टोलाही एकनाथ शिंदेंनी शहाजीबापूंना लगावला.