Marathwada monsoon alert;जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड ;हवामान विभागाचा मराठवाड्याला इशारा

Marathwada monsoon alert;Heavy rainfall in July; Meteorological Department warns Marathwada

 

 

 

बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.

 

केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा;Pratap Saranaik broke;आता बोला;महाराष्ट्राचा मंत्रीच म्हणतो हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली

तर, दुसरीकडे जुलै महिन्यात महाराष्ट्रात हाहाकार माजणार आहे. जुलै महिन्यात पावसाबाबत हवामान खात्याने भयानक अंदाज वर्तवला आहे.

 

यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात मान्सून पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा;Sheikh Hasina News;बांग्लादेशात शेख हसीनाला मृत्यदंड?

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित करण्यात आला आहे..

वाऱ्याचा वेग, सूर्या प्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे राहुरी, परभणी, निफाड, अकोला,पाडेगाव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून

हे सुद्धा वाचा;Rain warningALERT;1 ते 3 जून दरम्यान कुठे पडणार पाऊस ;हवामान विभागाचा काय आहे अंदाज ?

दापोली, नागपूर, सोलापूर ,जळगाव, धुळे , पुणे आणि कराड येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.

 

तसेच जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड राहतील असे हवामान राहणार आहे.

हे सुद्धा वाचा;अजित पवारांकडून स्वतःच्याच मंत्र्याला कानपिचक्या

पावसाची चाहूल लागली त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार सज्ज झालंय.. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतक-यासह सरकारनं ही तयार केलीय मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामासाठी आढावा बैठक घेतली.

 

यंदा पाऊस अधिक पडणार असल्यानं फडणवीस सरकारनं सर्व विभागानं सज्ज राहण्याचे आदेश दिलेत.. जिथे अधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी सर्व अधिका-यांना

हे सुद्धा वाचा;Pankaja Munde News; धनंजय मुंडेच्या विपश्यना केंद्रात;काय म्हणाल्या पंकजा मुंडे

कायम सज्ज राहण्याच्या सूचना फडणवीसांनी बैठकीत दिल्यात.. तर पावसाचा अंदाज लक्षात घेता सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात..

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *