ब्रेकिंग न्यूज;सुरक्षा नंबरप्लेट नसेल तर आरटीओ कडून कोणतीही सेवा पुरविण्यात येणार नाही

Breaking News; No service will be provided by RTO if there is no security number plate

 

 

 

उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवलेली नसेल किंवा त्यासाठीची नोंदणी केली नसल्यास, तर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) नूतनीकरणाव्यतिरिक्त इतर कोणतीही सेवा पुरविण्यात येणार नाही.

हे सुद्धा वाचा; अजित पवारांकडून स्वतःच्याच मंत्र्याला कानपिचक्या

जिल्ह्यातील अशा २१ लाख वाहनांना त्याचा फटका बसणार आहे. पुण्यामध्ये २६ लाखांपैकी सुमारे पाच लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी अडीच लाख वाहनांना या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत.

 

उर्वरित २१ लाख वाहनांची या नंबरप्लेटसाठी नोंदणी होणे आवश्यक असल्याने परिवहन विभागाने आता निर्बंधाचा बडगा उगारला आहे. अनेकांना ही नोंदणी कशी करावी, याची माहिती नसल्याने वाहनचालक कोंडीत सापडले आहेत.

हे सुद्धा वाचा;India’s situation is very bad in the world;सेना नेत्याचा हल्लबोल म्हणाले, भारताची अवस्था जगात अत्यंत बिकट

पुणे वगळता राज्यात उर्वरित ठिकाणी सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद आहे. या कामाला गती येण्यासाठी परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना सुरक्षा नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 

जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे कार्यक्षमता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज, खासगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण; तसेच उच्च सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली नसेल, तरी अडवणूक करू नका, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा;Sheikh Hasina News;बांग्लादेशात शेख हसीनाला मृत्यदंड?

परिवहन विभागाने सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सध्या नोंदणी केल्यानंतर ऑगस्टपर्यंतच्या तारखा मिळत आहेत.

 

सुरक्षाप्लेटसाठी नोंदणी केलेल्या वाहनांची कोणतीही कामे रखडणार नाहीत, असे परिवहन विभागाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

उच्च सुरक्षानंबर प्लेट नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नागरिक परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/Zone-Wise Website Redirect.html या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. ज्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा;Pratap Saranaik broke;आता बोला;महाराष्ट्राचा मंत्रीच म्हणतो हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली

त्यांच्यासाठी ई-सेवा केंद्रावर ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. सुरक्षा नंबरप्लेटसंदर्भात मदत हवी असल्यास पुणे आरटीओ कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

काय आहेत सूचना ?
– वाहन हस्तांतर, नोंदणी प्रमाणपत्रांमध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्तीय बोजा चढवणे व उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे ही कामे सुरक्षानंबर प्लेट बसवल्याशिवाय करू नयेत.

हे सुद्धा वाचा;Sharad Pawar’s U-turn;शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या मुद्यावर शरद पवारांचा यु टर्न

– सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केलेल्यांची अडवणूक करू नये. नोंदणीच्या पावतीची खातरजमा करून त्यांची कामे वेळेत मार्गी लावावीत.

 

ज्या वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यांनी त्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी. ज्यांनी अपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही काम थविणार नाही, अशी माहिती पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा;World War III;डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान;रशियाने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

वाहनांवर उच्च सुरक्षा नोदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवल्यानंतर केंद्र चालकांकडून वाहनाचे छायाचित्र कंत्राट मिळालेल्या कंपनीला पाठविले जाते.

 

कंपनीकडून ते प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाते. मात्र यात तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आता नागरिकांकडून प्राप्त होऊ लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा;Pratap Saranaik broke;आता बोला;महाराष्ट्राचा मंत्रीच म्हणतो हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली

राज्य परिवहन विभागाच्यावतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट नाहीत.

 

त्यामुळे ३० जून २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला.

१ एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत वाहनांवर एचएसआरपी आधीच बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा;CRIME NEWS;पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा ;पाहा काय आहे प्रकरण

‘एचएसआरपी’ नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या असून, त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो.

 

या प्लेट्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज ओळखल्या जाऊ शकतात, ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.

नागरिकांकडून प्रतिसादही मिळत आहे. नंबरप्लेट बसवल्यानंतर काही वाहन चालकांना तांत्रिक कारणांमुळे वाहनाचे छायाचित्र अपलोड झाले नसल्याचे कारण दिले जात आहे.

हे सुद्धा वाचा;BREAKING NEWS;मान्सून च्या पहिल्या आठवड्यातच धरणातून पाणी सोडण्याचा मोठा निर्णय;सतर्कतेचा इशारा

पुन्हा छायाचित्र अपलोड करण्याचा उल्लेख या संदेशात आहे. कंत्राटदाराने देऊ केलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर हे छायाचित्र मागविण्यात आले आहे.

 

परिवहन विभागाशी संपर्क साधला असता हे काम कंत्राटदाराचे आहे, वाहनचालकाचे नाही असे सांगण्यात आले. कंत्राटदार कंपनीकडून मात्र आग्रह धरला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *