राज्यातील सरकार म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका;एकनाथ खडसें
Government in the state means two wives and fajiti Aika; Eknath Khadse

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे तीन रंगाचे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका, असा हल्लाबोल खडसे यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती आहे. चोरी, दरोड्यांसह इतर गुन्हेदेखील वाढत आहेत.
या सरकारमध्ये काय चाललंय? हे तीन रंगाचे हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका अशी आहे,
असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर यांच्यावर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील सर्वांवर त्यांनी टीका केली.सरकारमधील बेरोजगारी कमी झाली. मात्र,राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढली, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
आगामी निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. मागील 35 वर्षांपासून विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपात दाखल झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड यांनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा देत भाजपात मुंबई येथे प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढले आहेत.
त्यांनी महाजनांविरोधात चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नाही. अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या मिरवणुकीत संजय गरुड यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये येण्याचा सल्ला दिला.
मंत्री गिरीश महाजन यांच्या सल्ल्यानंतर संजय गरुड यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.