मनोज जरांगे यांना भाजप आमदाराचा इशारा;प्रकरण चिघळले

BJP MLA's warning to Manoj Jarange; the matter escalated ​

 

 

 

 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले आहेत.

 

 

दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले, जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते. बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला.

 

 

 

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र सरकारचा त्रास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिंदे सरकारने मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करूनही आंदोलने थांबत नाहीत.

 

 

 

 

आता आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन

 

 

 

कमकुवत करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप सरकारवर केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली.

 

 

भाषण सुरु असताना मनोज जरांगे आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर जात आहे. रस्त्यात मेलो तर मला सागर बंगल्यावर न्या, असे जरांगे म्हणाले.

 

 

 

 

अंतरवाली सराटी येथे बैठक चालू असतांना मनोज जरांगे देवद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघाले. मराठा समाज त्यांची समजूत काढत होते.

 

 

मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. या सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

 

 

 

मनोज जरांगे म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे.

 

 

 

यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, मला प्रश्न पडला आहे की मनोज जरांगे यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीस यांच्या नावाने राजकारण करायचं आहे.

 

 

 

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळालं आहे. आता कर्टात जी लढाई लढली जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठा आधार देवेंद्र फडणवीस यांचा मिळणार आहे.

 

 

 

मला विचार पडला की देवेंद्र फडणवीस यांना स्क्रिप्ट देते कोण? आरोप करण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं. मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार तर आम्ही काय गप्प बसणार का?

 

 

 

आम्हीपण मराठे आहोत. राजकारण करु नका, सगेसोयऱ्यांची मागणी आहे तर त्यावर मार्ग निघेल पण उठ सुट फडणवीसांवर टीका करता, धमक्या देता, असे नितेश राणे म्हणाले.

 

 

सागर बंगल्याआधी आमची भिंत आहे आधी. ती क्रॉस करुन दाखवा, मग पुढचं पुढे बघू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.

 

 

 

मनोज जरांगे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यावर का टीका करत नाहीत. फक्त देवेंद्र फडणवीसांवर का टीका करतात?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *