भाजप प्रतिसाद देत नसल्याने जानकरांची झाली मोठी पंचाईत !

As the BJP was not responding, a big panchayat was held by the Jankars

 

 

 

 

 

 

पाच मिनिटांसाठी का होईना, मला देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे वेळोवेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करून भाजपवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

 

 

वेळोवेळी इशारे देऊनसुद्धा भज जाणकारांकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे जाणकारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष राहिलेल्या जानकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचे

 

 

 

 

ते नेमका कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात ,त्यांच्या वेळोवेळी केलेल्या घोषणेने निवडणुकीत काय होणार जानकर कोणाच्या बाजूने राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

एकाचवेळी दोन मतदारसंघात निवडणूक लढण्याची तिरकी चाल खेळत महादेव जानकर भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून आपल्या पदरात काही पडून घेण्याच्या प्रत्नात आहेत , अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

 

 

 

जानकर यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्यामुळे जानकर कोणाला लाभ मिळवून देतील ,त्यांचा नेमका कोणाला फायदा होणार असे झाले तर महायुतीच्या उमेदवारासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते.

 

 

 

पण महादेव जानकर मैदानात उतरले तर महायुतीच्या विरोधातील मतदानाचा फायदा ठाकरे गटाला न होता तो रासपकडे वळेल आणि त्यात महायुतीचेच फावेल,

 

 

 

असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ अजूनही मिटला नाही.

 

 

 

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरायचेच असा निश्चय केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजुंनी चाचपणी करत आहेत.

 

 

 

 

मात्र यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत.

 

 

 

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र असल्याचे ते भाषणातून सांगतात. राष्ट्रीय समाज पक्ष प्रामुख्याने राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे.

 

 

 

मात्र महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षातील नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना ते सातत्याने व्यक्त करतात. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने होत असताना ओबीसी नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी ओबीसी एल्गार महासभा आयोजित केल्या.

 

 

 

बीड येथील महासभेत जानकर यांनी स्वतंत्रपणे परभणी येथून लोकसभा निवडणूक 2024 लढवण्याचे जाहीर केले. महायुतीच्या जागावाटपापुर्वीच त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यामुळे

 

 

 

महायुतीच्या घटकपक्षात नाराजीचा सूर उमटू लागला. जानकर यांनी माढा येथूनही निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली.

 

 

 

महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जानकर यांनी महाविकास आघाडीचाही पर्याय खुला ठेवला.एवढे करूनही भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जानकर यांची मोठी पंचायत झाली आहे.

 

 

 

आघाडीच्या नेतृत्वाकडून त्यांना अनुकूल प्रतिसाद असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही पर्याय खुले ठेवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 

 

 

 

महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु केल्याने कार्यकर्त्यांमधील एक गट जानकर यांच्या निर्णयामुळे अस्वस्थ आहे. कारण आजपर्यंत

 

 

 

जानकर यांची ठाम भूमिका असायची. मात्र दोन्ही डगरीवर हात ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाविषयी प्रथमच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर समाजातून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

 

यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मतदान होऊ शकते. या मुद्द्यावरच जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे.

 

 

 

 

मात्र महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही डगरीवर हात ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय त्यांच्या भूमिकेबद्दल शंकाही घेतली जात आहेत.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *