अजितदादांच्या राष्ट्रवादीची घड्याळ निशाणी अडचणीत ? सुप्रीम कोर्टाकडून मोठे संकेत

Ajitdad's NCP watch mark in trouble? A big signal from the Supreme Court

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला. त्यामुळे पक्षाचे घड्याळ चिन्हही अजित पवारांना मिळाले.

 

 

 

आता त्यावरच शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून घड्याळ चिन्ह वापरू न देण्याची जोरदार मागणी केली. त्यावर कोर्टानेही घड्याळ चिन्हाबाबत महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

 

 

 

 

निवडणूक आय़ोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज त्यावर न्यायाधीश सुर्यकांत

 

 

 

 

आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्यासमोर सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जात असल्याचे कोर्टात सांगितले.

 

 

 

सिंघवी यांनी कोर्टात शरद पवारांचा फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवली. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्हीच मते मिळवा. शरद पवारांचे नाव वापरून कशाला मते मागता, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

कोर्टानेही अजित पवार गटाला ठणकावताना तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचेच फोटो वापरा, त्यांचे फोटो का वापरत आहात, असा सवाल उपस्थित केला.

 

 

 

 

स्वतंत्र होण्याचा निर्णय तुम्ही घेतला आता त्यावर ठाम राहा. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यां आवरावे. शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही,

 

 

 

याची हमी देण्याचे निर्देश कोर्टाने आज अजित पवार गटाला दिले. सिंघवी यांनी घड्याळ चिन्हाच्या वापरावरही आक्षेप घेतला.

 

 

 

आम्हाला नवीन चिन्ह मिलाले त्यांनीही घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे. घड्याळ चिन्हही शरद पवारांची ओळख आहे. त्यावर अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला.

 

 

 

 

पण कोर्टाने सिंघवी यांच्या मुद्दया दुजोरा देत अजित पवार यांनी निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही,

 

 

असे कोर्टाने सुचवले आहे. दोन्ही गटांना यावर म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले असून पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

 

 

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं.

 

 

त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

 

 

 

यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा यावेळी शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका,

 

 

 

असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

 

 

 

सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले.

 

 

 

 

त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.

 

 

 

 

त्याचबरोबर अजित पवार गटानं शरद पवार यांच्या छायाचित्राचा वापर करु नये. अशा शब्दांत कोर्टानं अजित पवार गटाचे कान टोचले आहेत. तुम्ही त्यांच्या फोटोचा वापर का करता असा प्रश्नही विचारला आहे.

 

 

 

तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रकारे शरद पवार यांचा फोटो किंवा चिन्ह वापरु शकत नाही असेही कोर्टानं म्हटले आहे.

 

 

 

 

तुमच्या पक्षाला आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी (एनसीपी) अशी ओळख मिळाली असताना तुम्ही एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो का वापरता असा सवालही कोर्टानं अजित पवार गटाला विचारला आहे.

 

 

 

शरद पवार गटाकडून वकील मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात. ही फसवणूक आहे.

 

 

 

त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे शरद पवार यांचा फोटो वापरलेले पोस्टर्स देखील दाखवले.

 

 

 

 

“ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे,

 

 

 

 

असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे?” असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

 

 

 

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत अस लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.

 

 

यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 18 मार्च रोजी होणार आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *