नांदेड लोकसभा;पहा कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती ?

Nanded Lok Sabha; See which candidate has how much wealth

 

 

 

 

 

भाजप उमेदवार तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांची संपत्ती कोटींमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

 

तर, वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांची संपत्ती लाखोच्या घरात असल्याचे त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून समोर आलं आहे.

 

 

 

 

विशेष म्हणजे काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवार सोडून खासदार चिखलीकर यांच्या वर एक ही गुन्हा दाखल नाहीये, शिवाय त्यांच्यावर कोणत्याच बँकेचे कर्ज नाहीये.

 

 

 

 

प्रताप पाटील चिखलीकर यांनी २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळीही त्यांच्या नावावर ३ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता होती.

 

 

 

तर २०२२ मध्ये ५ कोटी ४० लाख २० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतापराव चिखलीकर यांनी नमूद केले आहे. यावरून पाच वर्षांत त्यांच्या स्थावर मालमत्तेत १ कोटी ७५ लाख ७० हजार रुपयांनी वाढ झाली आहे;

 

 

 

 

तर २४ लाख ५६ हजार ३९२ रुपयांनी जंगम मालमत्ता वाढली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा या शांतीदूत कॉटन इंडस्ट्रीजमध्ये एक भागिदार असून त्यांच्या नावावर १ कोटी ६१ लाख १२ हजारांचे कर्ज बाकी आहे.

 

 

 

 

चिखलीकर दाम्पत्याच्या नावावर ठिकठिकाणी मिळून २० हेक्टर जमीन आहे. चिखलीकर यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत नमूद करताना

 

 

 

 

शेती व लोकसभा सदस्य वेतन असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, असे नमूद केले आहे.

 

 

 

तीनदा आमदार राहिलेल्या वसंत चव्हाण यांचे उदरनिर्वाहाचे साधन माजी आमदार या नात्याने मिळणारे निवृत्ती वेतन आणि वडिलोपार्जित शेतीतून मिळणारे उत्पन्न हेच असल्याचे शपथपत्रातून दिसून येते.

 

 

 

 

सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील त्यांचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ६१ हजार ५० इतके होते. शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे रोख रक्कम २४ लाख ४३ हजार ८९० इतकी असून

 

 

 

 

त्यांच्याकडे फॉर्च्युनर टोयोटा व इनोव्हा ही दोन वाहने आहेत. १८ लाख २० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने आणि १ लाख १२ हजार रूपयांची चांदी एवढीच सुवर्ण-रौप्यसंपदा त्यांच्याकडे आहे.

 

 

 

त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेचे मूल्य २५ लाख १६ हजार आहे. शिवाय स्थावर मालमत्ता १ कोटी ४१ लाख १९ हजार १८० रुपये

 

 

 

 

तर जंगम मालमत्तेचे मूल्य २ कोटी १ लाख ५० हजार इतकी आहे. तसेच चव्हाण यांच्यावर एक गुन्हा न्यायप्रविष्ट आहे, असे नमूद केले आहे.

 

 

 

वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर भोसीकर यांच्याकडे ३ लाख २ हजार रुपये रोख असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हण्टले आहे.

 

 

 

शिवाय शंभर ग्राम सोन आणि शंभर ग्राम चांदी असल्याचे त्यांनी शपथपत्रात उल्लेख केला आहे. तसेच जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता देखील लाखोच्या घरात असल्याचे समोर आलं आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *