चालत्या एसटी बसमध्ये सासू सासऱ्यांनी मिळून केला जावयाचा खून

Murder to be committed by mother-in-law in a moving ST bus

 

 

 

धावत्या एसटीमध्येच जावयाचा सासू आणि सासर्‍याने खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. खुन केल्यानंतर जावायचा मृतदेह सासू आणि सासऱ्याने मध्यवर्ती बस स्थानकमध्ये टाकला होता.

 

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल आहे. जावाई दारू पिऊन मुलीला प्रचंड त्रास देत असल्याच्या रागातून सासू

 

आणि सासऱ्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. संदीप शिरगावे असे मृत जावयाचे नाव असून हनुमंत काळे आणि गौरवा काळे असं सासू-सासर्‍यांचे नाव आहे.

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबर रोजी सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली.

 

 

त्यानंतर शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पाहणी केली. यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

 

 

मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याचेजवळील आसलेल्या कागदपत्रावरून त्याचे नांव संदिप रामगोंडा शिरगांवे ( रा. चिंचवाड, ता. शिरोळ ) असलेचे समजले.

 

 

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक नेमून तपासासाठी रवाना केले.

 

दरम्यान मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूला चौकशी केले असता रात्रीच्या सुमारास अनोळखी एक महिला व एक पुरुष असे दोन व्यक्तीनी मृतदेह एस.टी. स्टॅन्ड परीसरात उचलून आणून ठेवले असलेचे निदर्शनास आले.

 

त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संदिप शिरगांवे हा दारुचा व्यसनी असून तो त्याचे पत्नीमुलास दारु पिऊन त्रास देत असलेने त्याची पत्नी व मुले त्याचेपासून विभक्त राहत असल्याचे पोलिसांना कळाले,

 

त्याचबरोबर घटना घडण्याअगोदर मृत जावई संदिप रामगोंडा शिरगांवे याचे सासु सासऱ्यांबरोबर वाद झाल्याचे सामोर आले.

 

 

पोलिसांनी सासू गौरा हनमंतआप्पा काळे व सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे ( दोघे रा. भडगांव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्यानी खुनाची कबुली दिली आहे.

 

संदिप शिरगांवे हा दारुचा व्यसनी असलेने तो पत्नी मुलांना नेहमी त्रास देत होता, त्यामुळें पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेवून तिच्या लहान मुलासह ती गडहिंग्लज मध्ये दोन वर्षापासून राहत होती.

 

तरीही संदिप शिरगांवे गडहिंग्लज येथे दारु पिऊन जावून पत्नीमुलांना त्रास देत मारहाण करत असल्याचे सासू-सासर्‍याने सांगितले.

 

दरम्यान तीन दिवसांपासून संदिप शिरगांवे हा गडहिंग्लज येथे जावून दारु पिऊन पत्नी, मुलास त्रास देवून मारहाण करीत होता. म्हणून संशयित आरोपी आसलेल्या सासू-सासर्‍यांनी त्याला समजावून सांगितलं,

 

तो ऐकत नसल्याने त्याला रात्री उशिरा कोल्हापुरात सोडण्यासाठी सासू-सासरे बिनावाहक बस मधून येतं होते. यावेळी पुन्हा एकदा बसमध्येच जावई आणि सासू-सासर्‍यांमध्ये जोरदार भांडण झालं.

 

 

त्यावेळी सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे आणि सासू गौरा हनमंतआप्पा काळे यांनी संदीपचा दोरीने गळा आवळून खून केला.

 

यानंतर मध्यरात्री एसटी कोल्हापूर स्थानकात येताच मृतदेह एस.टी. बस मधून खाली घेवून एस टी स्टॅन्ड आवारात ठेवून धूम ठोकली अस आरोपी सासू-सासर्‍याने पोलिसांना सांगितले.

 

 

या घडलेल्या घटनेनंतर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या खुणा मध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *