UGC-NET चा पेपर फुटला ? प्रकरणी CBI कडे ; VIDEO

UGC-NET Paper Cracked? CBI in the case

 

 

 

 

देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक घटकांची वक्रदृष्टी असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे. वैद्यकिय क्षेत्रातील प्रवेशपरीक्षा अर्थात NEET परीक्षेसंदर्भातील घोटाळा समोर आलेला असतानाच

 

 

 

शिक्षण मंत्रालयाकडून एकाएकी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेलाही रद्द करण्याचा निर्णय घेत सदर प्रकरणी CBI कडे चौकशीचे आदेश दिले.

 

 

 

शिक्षण मंत्रालयानं पाटणा येथील (NEET)-UF 2024 च्या कथित स्वरुपातील आयोजनामध्येही गैरव्यवहार झाल्याची बाब अधोरेखित करत

 

 

 

त्यासंदर्भाह बिहार पोलिसांच्या इकोनॉमिक क्राइम युनिटकडून सविस्तर अहवाल मागितला आहे, ज्याआधारे पुढील कारवाई करण्यात येईल.

 

 

 

 

शिक्षण मंत्रालयाकडून आधीच दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेली UGC-NET जून 2024 परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता तिचं पुन्हा आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचं वृत्त समोर येताच देशभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनही यासंदर्भात मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली.

 

 

 

 

X च्या माध्यमातून पोस्ट करत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारला काँग्रेसनं ‘पेपर लीक सरकार’ असं उपरोधिक नाव देत या साऱ्याची जबाबदारी शिक्षण मंत्री कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला.

 

 

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सरकारला निशाण्यावर घेत ‘परीक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी NEET परीक्षांवर केव्हा चर्चा करणार? असाही प्रश्न उपस्थित केला.

 

 

 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीसुद्धा युजीसी नेट परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारची निंदा करत त्यांनी या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित असल्याची मागणी स्पष्ट शब्दांत केली.

 

 

 

युजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा आयोजिक केली जाते. या परीक्षेमध्ये एकूण 83 विषयांचा समावेश असून, ती उत्तीर्ण करणाऱ्या परीक्षार्थींना पुढं शिक्षक बनण्यासाठीची पात्रता प्राप्त होते.

 

 

 

 

या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्रत विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणं अपेक्षित आहे. आरक्षण प्रवर्गांसाठी शैक्षणिक

 

 

 

पात्रतेमध्ये 5 टक्क्यांची मुभा दिली जाते. यूजीसी जेआरएफसाठी 30 वर्षे इतकी वयोमर्यादा असून, नेटसाठी मात्र कोणतीही वयाची अट नाही.

 

 

पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. पीएम मोदी पेपर लीक थांबवू शकत नाहीत. दोषींवर कठोर कारवाई करावी.

 

 

 

प्रामाणिक विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून NEET चा पेपर लीक झाल्याचे ते म्हणाले. NEET आणि UGC-NET पेपर लीक प्रकरणावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे सांगितले.

 

 

 

मोदींनी युक्रेनमधील युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्धही नरेंद्र मोदींनी थांबवले होते. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटीचे प्रकार थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर तोफ डागली.

 

 

 

 

ते म्हणाले की, बिहारबाबत आमचा मुद्दा असा आहे की, पेपर लीक करणाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत

 

 

 

आणि हे बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटल्याची तक्रार केली होती.

 

 

 

 

NEET, UGC NET चे पेपर लीक झाले, UGC-NET परीक्षा रद्द. हा व्यापमचा देशाच्या इतर भागात विस्तार आहे. पेपरफुटीचा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करू.

 

 

 

ते पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो यात्रेदरम्यान हजारो तरुणांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता NEET पेपरमधील घोटाळा समोर आला आहे. NET-UGC रद्द करण्यात आले आहेत.

 

 

पेपरफुटीमागे शिक्षण व्यवस्थेला भाजपच्या पालक संघटनेने काबीज केले आहे. जोपर्यंत तो पूर्ववत होत नाही तोपर्यंत पेपरफुटी सुरूच राहणार आहे.

 

 

 

मोदीजींनी हे होऊ दिले आहे, जे देशविरोधी कृत्य आहे. NEET UG परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने होत आहेत. लखनौ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

 

 

 

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने NEET UG समुपदेशनावर बंदी घालण्यास पुन्हा नकार दिला आहे. अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

 

 

यापूर्वी 11 जून रोजीही सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळले होते. परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाली.

 

 

 

49 विद्यार्थी आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.

 

 

याचिकाकर्त्यांनी परीक्षेत 620 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासण्याची आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे.

 

 

 

त्याचबरोबर पेपरफुटीच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने NEET UG प्रकरणी राजस्थान, कलकत्ता आणि मुंबई उच्च न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या याचिकांना एकत्र केले आहे.

 

 

 

आता 8 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *