सलमान खानला लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे ? वडील सलीम खान यांनी सांगितले गुपित
How does Salman Khan want a girl for marriage? Father Salim Khan told the secret
सलमान खानच्या चाहत्यांना तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याला नवरदेव म्हणून पाहण्याची इच्छा आहे. प्रत्येक सरत्या वर्षाने सलमान खानचे चाहते लग्न कधी करणार
असा प्रश्न त्याला विचारतात. त्याच्या गर्लफ्रेंडची यादीही बरीच लांबली आहे. हे ऐकून वाटले की यावेळी तो नक्कीच त्याच्या मैत्रिणीशी लग्न करेल.
मात्र प्रत्येक वेळी हा भ्रमच ठरला. सलमान खानच्या प्रेमप्रकरणानंतर त्याच्या ब्रेकअपच्या बातम्या येतच राहिल्या. शेवटी, सलमान खान लग्न का करत नाही? त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत याचे कारण सांगितले.
सलमान खान लग्न न करण्यामागे एक खास कारण काय आहे. खुद्द सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत याचे कारण सांगितले.
ज्याचा व्हिडिओ नाझिया पटेल नावाच्या इंस्टाग्राम चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सलीम खान म्हणतात की, तो सहजपणे रिलेशनशिपमध्ये जातो.
पण लग्न करण्याची त्याची हिंमत होत नाही. सलीम खान सांगतात की, सलमान खानचा स्वभाव अतिशय साधा आहे. तो आकर्षित होतो. पण जेव्हा त्याच्याशी लग्न करणारी मुलगी आपल्या आईसारखी संसार करणारी असावी , असा त्याचा विचार आहे.
सलीम खान सांगतात की, सलमान खानची इच्छा आहे की, त्याने कोणत्याही मुलीशी लग्न केले तरी तिने आपल्या पती आणि मुलांसाठी तिची आई जशी काम करत असे.
त्याने आपल्या मुलांसाठी स्वयंपाक करते . मुलांना तयार करते , त्यांचा अभ्यास करून घेते .अशा प्रकारचे काम करण्याची आजकालच्या मुलींची इच्छा नसते .
सलमान खान ज्या मुलींच्या प्रेमात पडला होता त्या स्वतः महत्वाकांक्षी होत्या . त्यांना करिअर घडवायचं होतं. त्यामुळेच सलमान खानची चर्चा लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही.असे सलीम खान म्हणाले.