शरद पवारांच्या कार्यक्रमात भाजप नेत्या व्यासपीठावर

BJP leader on stage at Sharad Pawar's event

 

 

 

 

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे विधानसभा निवडणुकीकडे. राज्याच्या राजकारणात रोज नव्यानव्या घडामोडी घडत आहेत.

 

अशातच आता अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार पहायला मिळाला आहे.

 

 

शरद पवार यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्या अमृता पवार या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

निफाडच्या चितेगाव मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या. यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार याचं सत्कार केला.

 

अमृता या येवला मतदातसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी

 

अमृता पवार तयारी करत आहेत. अमृता पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून सत्कार केल्याने सर्वांचे भुवया उंचावल्या आहेत.

 

 

अमृता पवार या नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय म्हणून देखील ओळखल्या जातात.

 

 

 

माजी खासदार वसंतराव पवार तसेच मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत. व्यवसायाने त्या अर्केटेक्चर आहेत. 2023 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

 

सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी गेले होते.. मात्र यावेळी छगन भुजबळांना तासभर वाट पाहावी लागली होती.

 

भुजबळांना भेटीसाठी का थांबावं लागलं होतं याची माहिती आता खुद्द शरद पवारांनीच दिलीय.. भुजबळांनी बीड, बारामतीच्या भाषणात माझ्याबद्दल प्रचंड आस्था आणि कौतुक व्यक्त केल्याचा टोलाही पवारांनी यावेळी लगावला.

 

भुजबळ तासभर बसून होते, जायचं नाही म्हणतात असा निरोप मला आला.. राज्याच्या हिताच्या गोष्टी करायच्या असल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यानंतर मग आपण भुजबळांची भेट घेतल्याचं पवारांनी म्हटलंय.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *