खुद्द मंत्रीच म्हणतात राज्यात ३० टक्के दुधात भेसळ

The minister himself says that 30 percent of milk in the state is adulterated ​

 

 

 

 

दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे.

 

 

मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. राज्यात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल, असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

 

कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी मंत्री कऱ्हाडला काही काळ थांबले होते. त्याचदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुधाला ३४ रुपये दर मिळावा, यासाठी नगरला उपोषण सुरू आहे,

 

 

त्या प्रश्नावर मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘आंदोलनकर्त्यांशी मी चर्चा केली आहे. काही दूध संघ, काही खासगी संस्था सरकारचा आदेश पाळत नाही, अशी तक्रार आहे. त्यासाठी खासगी, सहकारी दूध संघांची बैठक घेतली.

 

 

 

त्यास उपोषणकर्ते अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनाही बोलविले होते. मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही,

 

 

 

असे सांगितले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. राज्यात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो, तरी दुधाला चांगला दर देता येईल.’’

 

 

 

दूध दरासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करतोय, असे सांगून मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘या प्रश्नासंदर्भात मी खासगी, सहकारी दूध संघांशी चर्चा करतोय.

 

 

येत्या दोन-तीन दिवसांत अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, तरीही खासगी आणि सहकारी दूध संघ सरकारचे ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल.’’

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *