परभणी जिल्ह्यात लोडशेडिंग सुरु ?
Load shedding in Parbhani district

ऐन पावसाळ्यात सप्टेंबर -आॅक्टोंबर हिटचा तडाखा वाढला असतानाच महावितरण कडून ग्राहकांना लोडशेडींगचा शाॅक दिला जात आहे.मात्र कमी पडलेला पाऊस
आणि वीजेची वाढलेला मागणी, निर्माण होणारी तुट यामुळे जनतेला लोडशेडिंगचा सामना पुढील काही दिवस करावा लागणार असल्याचे स्पष्ट संकेत महावितरण कंपनीकडून मिळत आहेत.
परभणी जिल्हा,पूर्णा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या वतीने दिवसातून अर्धा,एक,ते दिड तासांपर्यंत”इमर्जन्सी लोडशेडिंग” सुरू
असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विज ग्राहकांना रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरं जावं लागत आहे.
परभणी जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. आता सप्टेंबर आॅक्टोंबर हिटचा परिणाम जाणवून उकाडा वाढला आहे.
परिणामी शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा सुरू केला आहे.गरजेच्यावेळीच महावितरण कडून विजेचा तुटवडा निर्माण केला जातो होत असुन
आपत्कालीन लोडशेडिंग ग्राहकांच्या माथी मारली जात आहे.का असा प्रश्न ग्राहकांतुन विचारला जात आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे.
विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे.वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असं महावितरणचे अधिकाऱी बोलत दाखवत आहेत.