पुर्णेत सकल मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

Bombing movement of entire Maratha community

 

 

पूर्णा -शेख तौफिक

 

महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग करुन आमरण उपोषणास बसले असून

 

त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतांना देखील सरकार त्यांच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे मराठा समाजात तिव्र असंतोष पसरला असून

 

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी

 

पुर्णा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर लोकशाही मार्गाने बोंबाबोंब आंदोलनाला सुरुवात केली.

 

 

पुर्णा शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेल्या या बोंबाबोंब आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव

 

बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झाले.  आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच….या निष्क्रिय सरकारच करायचं काय खाली मुंडकं वरी पाय…..

 

जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं……आदी घोषणांसह जय जिजाऊ जय शिवराय….आदी गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून

 

सदरील आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असून मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या

 

या बोंबाबोंब आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी होत आहेत……

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *