राष्ट्रवादीच्या आंदोलनाने महापालिका जागली ; खड्डा बुजवला

Municipal Corporation woke up with NCP's movement; The pit was filled

 

 

नाशिक / अमन शेख,

 

 

त्रिमूर्ती चौक ते कामटवाडादरम्यान मुख्य रस्त्यावर तीन ते चार फुटाचा खड्डा असून गेले १५ दिवसापासून मनपा
अधिकाऱ्यांनी त्यावर लोखंडी गज व बॅरिकेट्स लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे

 

आंदोलन करण्यात आल्याने महापालिकेने त्याची तत्काळ दाखल घेत सदरहू खड्डा बुजवला.त्रिमूर्ती चौक ते कामट वाडा या रस्त्यादरम्यान तीन ते चार फुटांचा खड्डा

 

गेल्या पंधरा दिवसांपासून असून त्यावर लोखंडे बॅरिकेट्स लावल्यामुळे दोन जण अपघात होता होता वाचले होते. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते व पदाधिकारी यांना समजताच त्यांनी

 

या ठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २४ तासात खड्डा दुरुस्त न झाल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे यांनी दिला होता.

 

यावेळी  प्रसिद्धी प्रमुख दर्शन लढ्ढा, नवीन नासिक विभाग प्रमुख विजय मटाले, युवक अध्यक्ष विकी डहाळे, समीर गोसावी, ओम मटाले, कृष्णा पवार,

 

अमोल पाटील, बंटी शेळके यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दाखल घेत तत्काळ हा खड्डा बुजवला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *