राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरुवारी परभणी,हिंगोली दौऱ्यावर
Governor C. P. Radhakrishnan on a visit to Hingoli on Thursday

हिंगोली : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे गुरुवार दि. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.55 वाजता जालना पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवरुन शासकीय हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण.
सकाळी 10.35 वाजता हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानावर आगमन व राखीव. 10.40 वाजता हेलिपॅड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.
10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता या कालावधीत विविध अधिकारी व मान्यवरांशी भेट घेऊन संवाद साधणार आहेत.
दुपारी 1 ते 2 वाजता ही वेळ जेवणासाठी राखीव आहे. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून मोटारीने पोलीस कवायत मैदानकडे प्रयाण
व 2.05 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व राखीव. 2.10 वाजता पोलीस कवायत मैदान येथून राज्यपाल महोदयांचे शासकीय हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण होईल.
गुरुवार दि. 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 2.35 वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने परभणी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन.
दुपारी 2.40 वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह परभणी कडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव.
दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह, परभणी येथे विविध क्षेत्रातील तज्ञांसमवेत संवाद. रात्री शासकीय विश्रामगृह, परभणी येथे मुक्काम.
शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण.
सकाळी 9.25 वाजता पोलिस मुख्यालय मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टरने यवतमाळकडे ते प्रयाण करतील.