बटेंगे तो कटेंगे वरून महायुतीत ठिणगी ;अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा
Batenge to Katenge spark in Grand Alliance; Ajitdad's Shiledara direct warning to BJP

राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या वादावर अजित पवार यांना सुनावले आहे. अनेक दशके अजित पवार अशा विचारधारेसोबत आहेत, जे धर्मनिरपेक्ष आणि हिंदू विरोधी आहेत.
स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे वास्तविक धर्मनिरपेक्ष नाहीत, अशा लोकांसोबत अजितदादा राहिले आहेत. त्यांच्यासाठी हिंदुत्वाला विरोध हीच धर्मनिरपेक्षता असल्याचे फडणवीस म्हणाले.
त्यांना जनतेचा मूड समजायला थोडा वेळ लागेल. लोक एकतर जनतेच्या भावना ओळखू शकले नाही अथवा या वक्तव्याचा अर्थ समजू शकले नाहीत. अथवा त्यांना बोलताना काही तरी वेगळंच सांगायचं होतं,
असं वक्तव्य फडणवीस यांनी अजितदादांचा उल्लेख करताना केला. त्यांनी बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्दावर अजितदादा आणि फडणवीस यांचे एकमत नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचा ओबीसी विभाजनाचा डाव आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत त्याचे संकेत दिले आहे. राज्यघटना आणि आरक्षणावर अमेरिकेत त्यांचे वक्तव्य त्यांची मानसिकता समोर आणते.
ज्याप्रमाणे काँग्रेस लोकांना जातीत विभाजनाचा प्रयत्न करत आहे, पंतप्रधान मोदी यांनी योग्य नारा दिला आहे. महाराष्ट्रात ओबीसीमध्ये 350 जाती आहेत.
या सर्व जाती मिळून ओबीसी समाज तयार होतो. हा एक दबाव समूह आहे, त्याचे कल्याण व्हायला पाहिजे, असे मत फडणवीस यांनी मांडले.
जर ओबीसीमधील 350 जाती विभागल्या गेल्या तर त्यांचा दबाव गट उपयोगी ठरणार नाही. त्यांचा दबाव संपून जाईल. ज्याप्रकारे भारत जोडोची स्थापन झाली. तो अराजक निर्माण करणारा समूह आहे.
ते भारत जोडो आंदोलन नाही तर भारताला समाज समाजात विभागणारा गट आहे. हा समूह भारताला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. मतदानाला उणेपुरे पाच दिवस उरले आहेत. त्यातच भाजपाने हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याने महायुतीमधील एक गट नाराज झाला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले.
मराठा-ओबीसी या वादाला काऊंटर करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे.
अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले. तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही
तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे.
भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील जाहीर सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. भाजपाने निवडणुकीत हिंदूत्व कार्ड खेळल्याचे मानले जात होते.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचार सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने या दोन्ही नाऱ्यावर सडकून टीका केली.
तर दुसरीकडे महायुतीच या घोषणेवरून ठिणगी पडली. अजितदादांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकरांचा आहे.
येथे शिवरायांची शिकवण आहे. साधु-संतांची पंरपरा आहे. राज्यात अशा वक्तव्याला थारा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पण असेच वक्तव्य केले.
त्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा दिला. तर आता अजितदादांच्या शिलेदाराने थेट काडीमोड घेण्याचा इशारा दिला आहे.
मानाखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात महायुतीतच टफ फाईट आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नवाब मलिक या मतदारसंघातून मैदानात उतरले आहे.
नवाब मलिक यांनी बटोंगे तो कटोंगे या नाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपाने वादग्रस्त मुद्दावर राजकारण थांबवलं नाही तर
आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू असा थेट इशाराच त्यांनी दिला. टीआयओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक विचार मांडले.