विधानसभा निवडणुकीत महायुती, मविआ सोबतच ‘तिसरी आघाडी’रिंगणात ?
Mahayuti, Maviya in the 'Third Alliance' arena in assembly elections?
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींशी काडीमोड घेतल्यानंतर आज तुपकर यांनी बुलढाण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
त्यावेळी बोलतना प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याशी आपली गुप्त भेट झाली असल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला.
बच्चू कडू राज्यात महायुती आणि महाविकास आघाडील टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करत आहेत. आपण त्यांना साथ देणार आहोत.
याच मुद्द्यावर माझ्या संपर्कात राज्यातील काही बडे नेते, आजी- माजी आमदार आहेत.” असा दावा तुपकर यांनी केली आहे.
बुलढाण्यात 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार -तुपकर रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पूर्वाश्रमीचे प्रमुख नेते आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात तुपकर यांचा राजकीय प्रभाव देखील मोठा आहे. नाराजी आणि संघटनेशी संबंधित विविध मुद्द्यांवर वर्षभरापूर्वी तुपकर यांनी काडीमोड घेतला होता.
आता तुपकर आपली स्वतंत्र ताकद बुलढाण्याच्या राजकारणात अजमावणार आहेत. आपण जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागांवर उमेदवार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे तुपकरांचे किती उमेदवार विजयी होणार? त्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण किती असेल, यावर महायुती आणि मविआच्या काही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे आपल्या खुल्या स्वभावामुळे आणि त्यांनी सरकारी धोरणांना अनेकदा केलेल्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत असतात.
बच्चू कडू यांनी आपलं उपद्रव मुल्य लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये अधोरेखित केलं आहे. कडूंनी दिलेल्या उमेदवारामुळे नवनीत राणांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.
त्यामुळे बच्चू कडूंनी जर राज्यात तिसरी आघाडी निर्माण केली तर निश्चितच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काही उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
आता बच्चू कडू खरंच तिसरी आघाडी स्थापन करणार असतील तर महायुतीचे नेते त्यांनी यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील ही बाब स्पष्ट आहे.