चक्क दीड वर्षांपासून सुरु होता बोगस टोल नाका
The bogus toll road had been running for almost one and a half years
गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटा टोल नाका उभारुन अनेक प्रवाशांची गेल्या दीड वर्षांपासून फसवणूक करण्यात आली आहे.
बामनबोरे-कच्छ हायवेच्या बायपास रोडवर काही स्थानिक शक्तीशाली लोकांनी टोल नाका उभारला होता. यातून ते प्रवाशांकडून पैसे वसूल करायचे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मोरबी खासगी जागेवर हायवेच्या बायपास रोडवर टोल नाका उभारण्यात आला होता.
प्रवाशांकडून नियमित टोलपेक्षा अर्धा टोल आकारला जात होता. अशा प्रकारे त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रवाशी आणि जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना फसवलं आहे.
अधिकृत वाघसिया टोल नाक्याच्या मॅनेजरने सांगितले की, स्थानिक जमीन मालक गेल्या दीड वर्षांपासून उघडपणे लाखो रुपये उकळत आहेत. आरोपी वाहतूक दुसऱ्या मार्गावरुन वळवत होते.
आणि रागघसिया गावात टोल उभारुन प्रवासांकडून पैसे वसूल केले जात होते. ही जमीन व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीच्या मालकीची असल्याचं सांगितलं जातंय.
विशेषत: ट्रक चालकांना दुसऱ्या मार्गावर नेऊन त्यांच्याकडून अधिकृत टोल नाक्यावर असलेल्या दरांपेक्षा अर्धा टोल आकारला जात होता.
गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. त्याकडे कोणाचं लक्ष न गेल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोरबी जिल्हाधिकारी जीटी पांड्या म्हणाले की, काही वाहने दुसऱ्या मार्गाने वळवले जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती.
तसेच प्रवाशांकडून टोल वसूल केला जात होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल करण्यात आलीये.
पोलिसांनी व्हाईट हाऊस सिरॅंमिक कंपनीचा मालक अमरषी पटेल, वनराज सिंग झाला, हरविजय सिंग झाला, धर्मेंद्रा सिंग झाला, युवराज सिंग झाला
आणि अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, स्थानिक शक्तिशाली लोक ट्रक चालकांना टोल देण्यासाठी बळजबरी करत होते.