प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मी पद सोडलं;कोण होणार नाव अध्यक्ष ?

State President Nana Patole said, I have resigned; who will be the next president?

 

 

 

राज्यात पर पडेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश आल्याचे बघायला मिळाले. तर त्यात काँग्रेसने राज्यात परत मोठी मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरला.

 

किंबहुना त्याचे श्रेय हे काही अंशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिलं गेलं. मात्र हेच चित्र विधानसभा निवडणुकीत पलटले असून महायुतीसह भाजपने कधी नव्हे ते अभूतपूर्व यश संपादन केलं.

 

तर दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना दारुण पराभवाला समोर जावे लागलंय. दरम्यान, आगामी स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून

 

नाना पटोले पायउतार होणार असल्याच्या अनेक चर्चा पुढे आल्या असतांना नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही सांगितले आहे की मला मुक्त करा. अशा शब्दात नाना पटोलेंनी भाष्य केलंय.

 

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचाराने या देशाला उभे केले आहे. ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली तेंव्हा देश उभा झाला. आम्ही स्मार्ट आहोत,

 

ज्या लोकांना लोकशाही वाचवायची आहे त्यांनी सोबत यावे. आज त्यांची वेळ आहे उद्या आमची येईल. मात्र हे केवळ फोटो सेशनसाठी नाही,

 

तर आपल्या राज्याची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त मतदार आहेत,असे म्हणत नाना पटोले यांनी मतदार यादीवर संशय घेतला आहे. भंडारा आयुध निर्मानी मध्ये स्फोट झाला,

 

त्या कारखान्यात अरडीएक्स तयार होतं. त्यात अपरेंटिस पाठवले जातात. मात्र त्या ठिकाणी 60 वर्षाचे यंत्र आहेत, ही अलीकडची दुसरी घटना असल्याचे सांगत पटोले यांनी भंडाऱ्याच्या दुर्घटनेवरही भाष्य केलंय.

 

दुसरीकडे बॉण्ड बद्दल कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र त्यांची गेंड्याची कातडी आहे. सोयाबीनची खरेदी बंद झाली, पाऊस खरेदी बंद, तुरीचे इम्पोर्ट केलंय त्यामुळे किंमत पाडली आहे.

 

दाओस मध्ये जाऊन गुंतवणूक आणण्याची गरज नव्हती. काही कंपनी विदेशी असल्या तरी इतर सर्व इकडच्याच होत्या. तसेच बिअर आणि दारू बनवणाऱ्या कंपन्या राज्यात आणल्या.

 

महाराष्ट्राला दारूचे राष्ट्र बनवायचे आहे का? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी विचारला आहे. एकनाथ शिंदे यांनी आणलेली गुंतवणूक कुठे गेली, किती रोजगार दिले?

 

लाखो कोटींची जमीन उद्योगाच्या नावावर नाममात्र किमतीवर देत आहेत, राज्य कर्जबाजारी आहे. हे राज्य लुटू नका, राज्य सांभाळा, राज्य बरबाद करण्यासाठी नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

दरम्यान आता कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत,

 

तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का असेल, अशी चर्चा काँग्रेस पक्षात रंगली आहे. विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे या पदासाठी चांगलीच चर्चेत आहेत.

 

लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली होती. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आता चार वर्षे झाली आहेत.

 

त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळावलं. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

 

यामुळे पटोले यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षामध्ये पुन्हा उत्साह निर्माण करेल,

 

अशा नेतृत्वाच्या शोधात काँग्रेस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांच्या चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

प्रदेशाध्यक्ष पदासाठी यशोमती ठाकूर यांचं देखील नाव विदर्भातून पुढे चर्चेत येत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात आधिक जागा जिंकल्या आहेत. लोकसभेत काँग्रेसला विदर्भामध्ये चांगलं यश मिळालं.

 

विदर्भातून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव विधिमंडळ गटनेतेपदासाठी चर्चेत आहे. पटोले किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी कोणालाही विधिमंडळ गटनेते बनवले तर प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जावू शकते, अशी चर्चा आहे.

 

अमित देशमुख यांना प्रदेशाध्यपद देण्यासाठी पटोले आग्रही आहेत. सतेज पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जुलैमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपत आहे.

 

त्यामुळे कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. त्यासाठी देखील सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वजीत कदम यांचे नाव देखील चर्चेत आहे. पक्षातील तरुण नेते स्वतःहून हे पद घेण्यास इच्छुक नाहीत, असंही म्हटलं जातंय.

 

त्यामुळे पक्षातील बडे नेते किंवा तरूण नेते यांच्यापैकी कोणी स्वतःहून हे पद घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र आहे, मात्र, पक्षाने दिले तर ही जबाबदारी घ्यावी लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या होणाऱ्या नावांच्या चर्चेबाबत बोलताना म्हटलं, होणाऱ्या चर्चांवर माझं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाही. या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हे मला माहीत नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *