भारतात 13,400 कोटींचा गंडा घालणाऱ्या मेहुल चोक्सीला झाला गंभीर आजार

Mehul Choksi, who defrauded India of Rs 13,400 crores, falls seriously ill

 

 

 

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मास्टरमाईंड तथा कर्जबुडव्या हिरा व्यापारी मेहुल चोक्सी याला गुंतवणूकदारांची चांगचीच हाय लागली आहे. मेहुल चोक्सी याला कॅन्सरची लागण झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

 

मेहुल चोक्सीवर बेल्जियममध्ये उपचार सुरु आहेत. मेहुल चोक्सीच्या वकिलाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13,400 कोटींचा गंडा घालून आपल्या कुटुंबासह देशातून पसार झाले होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी या कुर्जबुडव्या भामट्यांना आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरार म्हणून घोषित केलं होतं.

 

त्याला फरार गुन्हेगार घोषित केल्याने त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई तपास यंत्रणाकडून सुरु आहे. या कारवाईतून त्याची आर्थिक नाकाबंदी होऊ शकते.

 

त्यामुळे तपास यंत्रणांकडून त्याच्या मालमत्तेवर टाच आणली जात आहे. पण दुसरीकडे मेहुल चोक्सीने कॅन्सर झाल्याचं कारण देत प्रकृती अस्वास्थामुळे आपण भारत परत येण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.

तपास यंत्रणांची मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. तपास यंत्रणांनी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या भारतातील मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 

आरोपी पकडले जावेत यासाठी त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येत आहे. पण तपास यंत्रणांच्या याच कारवाई विरोधात मेहुल चोक्सीने कोर्टात धाव घेतली आहे.

 

आपण आजारी असल्याचं कारण देत कोर्टात हजर राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला वेळ द्यावा. तसेच संबंधित कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी चोक्सीकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोर्टाने आरोपी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर कोर्टात हजर न राहण्यावरुन वारंवार ताशेरे ओढले आहेत.

 

या प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातच्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा मेहुल चोक्सीच्या वकिलांनी चोक्सीला कॅन्सरचा आजार झाल्याची शक्यता वर्तवली. तसेच त्याच्यावर बेल्जियममध्ये उपचार सुरु असल्याची माहिती कोर्टाला दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *