अपघातात आमदार गंभीर जखमी
MLA seriously injured in accident

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहाणी दौऱ्यात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे जखमी झाले आहेत. अंबरनाथ क्रीडा संकुल परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे.
या परिसरात असलेलं एक गटार ओलांडताना तोल जाऊन आमदार राजेश मोरे हे गटारीमध्ये पडले. या अपघातामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज श्रीकांत शिंदे यांचा कल्याणमध्ये चार ठिकाणी पाहणी दौरा होता. त्यापैकी एक अंबरनाथमधील अंबरनाथ मंदिराला ते भेट देणार होते,
त्यानंतर डोंबिवलीमधील शिवमंदिर आणि आणखी दोन ठिकाणी त्यांचा पहाणी दौरा होता. मात्र श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यापूर्वीच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे तिथे पोहोचले.
यावेळी क्रीडा संकुलाकडे जात असताना एक नाला ओलांडताना त्यांचा तोल गेला आणि ते गटारीत पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आज श्रीकांत शिंदे यांचा कल्याणमध्ये चार ठिकाणी पाहणी दौरा होता. त्यापैकी एक अंबरनाथमधील अंबरनाथ मंदिराला ते भेट देणार होते, त्यानंतर डोंबिवलीमधील शिवमंदिर आणि आणखी दोन ठिकाणी त्यांचा पहाणी दौरा होता.
मात्र श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यापूर्वीच आमदार राजेश मोरे हे तिथे पोहोचले. यावेळी क्रीडा संकुलाकडे जात असताना एक नाला ओलांडताना त्यांचा तोल गेला
आणि ते गटारीत पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.