ट्रॅक्टर-कारच्या अपघातात तीन शिक्षकांसह चालक ठार ;मराठवाड्यातील घटना
Driver along with three teachers killed in tractor-car accident; Incident in Marathwada
तुळजापूर औसा महामार्गावर कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन शिक्षकांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
हे शिक्षक जिल्हा परिषदचे शिक्षक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे.
लातूरमध्ये तुळजापूर औसा महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्यांपैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पण जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बाबा पठान, जयप्रकाश बिराजदार, संजय रणदिवे, राजू बागवान अशी अपघात मृत्यूमुखी पडलेलल्या व्यक्तींची नावे आहेत.
औसा तालुक्यातील शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री 12:50 वाजता औसाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर घडली.
हा अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन 30 फुटांवर जाऊन पडले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
कारची अवस्था इतकी भीषण होती की, पहाटे 4:30 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान यांचा समावेश आहे.
नाशिक शहरात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस निरीक्षकाचा लष्कराच्या वाहनाखाली मृत्यू झाला आहे. मयत पोलीस निरीक्षकाचे नाव कुंदन सोनवणे असे आहे.
कर्तव्यावरून घरी जात असताना देवळाली कॅम्प वडनेर गेट च्या दरम्यान दुचाकी वरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि थेट त्यांची त्यांचे दुचाकी लष्कराच्या वाहनाखाली आल्याने अपघातामध्ये ते जबर जखमी झाले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.