राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचे’ बॅनर्स, गाड्यांची तोडफोड,पाहा ;VIDEO

Rahul Gandhi's 'Bharat Jodo Nyaya Yatra' banners, vandalized cars

 

 

 

 

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज सहावा दिवस आहे, सध्या ही यात्रा आसामधून जात आहे. मागील सहा दिवसांपासून राहुल गांधी यांनी मणिपूर आण नागालँडसह आसामच्या अनेक भागांमधून प्रवास करत आहेत.

 

 

 

यादरम्यान काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आसाममध्ये भाजपच्या गुंडांनी भारज जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स फाडत गाड्यांची तोडफोड केल्याचा आऱोप केला आहे

 

 

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यामध्ये पटोले यांनी सांगितलं की, काल आसाममध्ये भाजपाई गुंडांकडून भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स,

 

 

गाड्यांच्या ताफ्याची, तोडफोड करण्यात आली, त्यांना एकच सांगणे आहे, तुम्ही कितीही द्वेष करा, आम्ही प्रेमाने, लोकशाही मार्गानेच पुढे जाऊ,

 

 

हा भारताचा प्रवास आहे, अन्यायाविरुद्ध न्यायाचा प्रवास आहे, ‘भारत जोडो न्याय यात्रा’ कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही! असे पटोले म्हणाले आहेत.

 

 

यासोबोत एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये रात्री गाड्यांची तोडफोड करातनाचे, तसेच पोस्टर फाडले जात असतानाच्या क्लीप्स दाखवण्यात आल्या आहेत.

 

 

काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यासोबत आसामच्या लखीमपूर येथे भारत जोडो यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला.

 

 

 

भाजपच्या गुंडांनी भारत जोडो यात्रेचे पोस्टर-बॅनर आणि गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार भेकड आणि लाजीरवाना प्रकारामुळे भारत जोडो यात्रेला मिळत असलेलं प्रेम आणि समर्थन पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला आहे.

 

 

 

मात्र मोदी सरकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे आसामचे मुख्यमंत्री यांनी लक्षात ठेवावं की ही भारताची यात्रा आहे. अन्यायाविरोधात न्यायाची यात्रा आहे.

 

 

 

भारत जोडो न्याय यात्रेला कोणतीही ताकद रोखू शकत नाही. ही यात्रा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे, असे म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *