बिहारमध्ये लालूंनी फक्त 4 आमदार असलेल्या पक्षाला दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर

In Bihar, Lalu offered the chief ministership to a party with only 4 MLAs

 

 

 

 

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राज्यसह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकडे बिहारमध्ये तर वेगळंच चित्र दिसत आहे.

 

 

एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपप्रणित एनडीए आघाडीशी जवळीक साधून आहेत. असं असताना तिकडे लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलने थेट माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

 

 

 

जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाचे केवळ चार आमदार आहेत. तर आरजेडीचे सर्वाधिक 79 आमदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड कडे 45 आमदार आहेत.

 

 

 

बिहारमध्ये सध्या सत्तेत नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची सत्ता आहे. मात्र आता नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात असल्याने बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.

 

 

 

दरम्यान, लालूंच्या पक्षाने दिलेली ऑफर जीतनराम मांझी यांनी फेटाळल्याची माहिती हम पक्षाचे प्रवक्ते दानिश रिजवान यांनी एबीपी नेटवर्कला दिली. जर त्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर जरी दिली तरी आम्हाला नको.

 

 

 

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होतो आणि राहू,असं हम पक्षाने म्हटलं. येत्या काही तासात बिहारमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळतील असं रिजवान म्हणाले.

 

 

आमच्यासाठी कोणत्याही पदापेक्षा बिहारचा विकास हा महत्त्वाचा आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत आणि आमचे आमदारही एकजूट आहेत, असा विश्वास रिजवान यांनी व्यक्त केला.

 

 

 

बिहार विधानसभा 243 सदस्यांची आहे. म्हणजे विधानसभेचे 243 आमदार आहेत. विधानसभेच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला.

 

 

आरजेडीला 79 जागा मिळाल्या. दुसऱ्या स्थानावर 78 आमदारांसह भाजप आहे. तिसऱ्या स्थानावर सध्याच्या महायुतीतील जेडीयू अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत. सत्ताधारी युतीत काँग्रेसही आहे, ज्यांच्याकडे 19 आमदार आहेत.

 

 

 

बिहारमधील संख्याबळ
आरजेडी – 79

भाजप – 78
जेडीयू – 45
काँग्रेस – 19
CPI(ML)L – 12
हम – 4
CPI -2
CPIM – 2
अपक्ष,इतर – 1
MIM – 1
————-
एकूण – 243

 

 

 

 

नितीशकुमार यांच्याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात नितीश कुमार यांच्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

 

 

 

असं असलं तरी नितीश कुमार यांच्या एनडीएमधील समावेशाच्या चर्चांनंतर लालू यादव कॅम्प अॅक्टिव्ह झाला आहे. नितीश कुमार वगळता आघाडीचे 114 आमदार आहे तर बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे.

 

 

 

नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे.

 

 

 

विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *