कापूस ,सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
As the prices of cotton and soybeans fell, farmers' anxiety increased
शेतकऱ्याचे पांढरे सोने असलेल्या कापसाला यंदा खूपच कमी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात साडेसात हजाराच्या वर कापसाचे भाव गेलेच नाही.
यात आता पुन्हा कापसाचे दर कोलमडले असून कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून आता मिळेल त्या भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यंदा कापसाचा हमीभाव ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापसाला ६ हजार २०० ते ६ हजार ४०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे.
यामध्ये उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता मिळेल त्या भावात कापसाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक झालं सहन करावी लागत आहे.
अमरावतीत पांढऱ्या सोन्याचे भाव कोलमडल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. शासनाचे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने कापसाचे भाव पडले असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कपाशीचा उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी उत्पादनात घट झालेली आहे.
सोयाबीनला सुरवातीला पाच हजाराच्यावर भाव मिळाला होता. यामुळे आणखी भाव वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे शेतकऱ्यांनी वेयर हाऊसमध्ये सोयाबीनची साठवणूक केली. मात्र सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात १ हजार ते १२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परभणी जिल्ह्यात जवळपास दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली गेली. गेल्या वर्षी अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व बाजारात आवक कमी झाल्याने सोयाबीन विक्रमी दहा हजाराचा भावाने विकले गेले.
यावर्षी सोयाबीनला जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सुरुवातीला ५१०० ते ५२०० रुपये भाव मिळाला. शेतकऱ्यांनी ह्या भावाने आपले सोयाबीन वेयर हाउसमध्ये ठेवले. शेतकऱ्यांना वाटले की भाव वाढेल ह्या आशेवर सोयाबीन वेयर हाउसमध्ये ठेवत त्यावर कर्ज घेतले.
दरम्यान आता बाजारात सोयाबीन १००० ते १२०० रुपयाने खाली आल्याने साडेचार हजार प्रतिक्विंटल रुपये भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेयर हाउसमध्ये सोयाबीन ठेवत कर्ज घेतले आहे.
अश्या शेतकऱ्यांना वेयर हाउसने नोटीस देत पैसे परत करा किंवा तुमच्या सोयाबीनचा आजच्या ४१००- ४२०० रुपये प्रतिक्विंटलने लिलाव करून आमचे पैसे जमा करू; अश्या आशयाची नोटीस दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.