मराठा आंदोलकामुळे लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगासमोर पेच !
Embarrassment before the Election Commission in the Lok Sabha elections due to Maratha protestors!
रफिक शेख /मराठवाडा प्रतिनिधी
मराठा आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
अर्ज जर जास्त आले तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे. मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करणे पण जिकरीचे काम असणार आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा सुरु आहे. या लढ्याला यश येत असतानाच सगेसोयरेवरुन सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे.
दहा टक्के मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
तर मराठा आंदोलक आता निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उभे करण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.
384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत
मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास जिल्हा प्रशासनला मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल, अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे. ही पण एक मोठी अडचण प्रशासनासमोर आहे.
प्रशासनाला मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निवडणूक आयोगाला प्रशासनातर्फे निदर्शनास आणून दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.