महायुतीच्या जागावाटपाबाबत काय म्हणाले अजित पवार?
What did Ajit Pawar say about Mahayuti's seat allocation?
देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यात जागावाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तिढा असल्याचे दिसून येत आहे.
अशातच अनेक बातम्या समोर येत आहे. जागांबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहेत, या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना जागावाटपाबाबत चित्र लवकरच स्पष्ट होईल. ९९ टक्के काम झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करू असं अजित पवार बोलताना म्हणाले.
तर यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जागा आम्ही भरपूर मागितल्या आहेत. २३ तर आधीच भाजपचे खासदार आहेत.
१८ शिवसेनेचे आहेत. त्यातील काही उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहेत. हे चित्र तिथं मांडलं गेलं. या जागा जवळपास ४१ जागा या होतात. तरीदेखील आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल, अशा पध्दतीने आम्ही जागा मागितल्या आहेत.
आज पत्रकार परिषदेत बोलताना रायगडमधून सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार यांनी घोषित केली. महायुतीत जागावाटपाचं ९९ टक्के काम पूर्ण करण्यात आलं आहे.
संध्याकाळी आढाळराव पाटील यांचा पक्षप्रवेश आहे. त्यानंतर बाकी उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
गेल्या निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या. ४ राष्ट्रवादी काँग्रेस, १ नवनीत राणा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. एमआयएमची एक जागा होती.
कारण नसतना राष्ट्रवादीला ३ जागा मिळतात, अशी चर्चा पसरवली गेली. मात्र कार्यकर्त्यांचं समाधान होईल तेवढ्या जागा मिळाल्या आहेत.
एकत्र पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते जाहीर करु. बारामतीत तुमच्या मनात ज्यांच नाव आहे, त्यांच नाव जाहीर होणार आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.