BREAKING NEWS;सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार
Firing by unknown persons outside Salman Khan's house

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार,
दोन अज्ञात दुचाकीवरून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. तेव्हा त्यांनी तिथे ३-४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नाही.
पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलमान खानच्या घराबाहेर आहे.
पोलिस सलमान खानकडून याबाबतची माहिती घेत आहेत. तसेच, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमही याठिकाणी दाखल झालेली आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर ४ राऊंड फायर करण्यात केल्याची माहिती आहे. हल्लेखोर दुचाकीवर आले आणि त्यांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला.
सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. ही घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारात अज्ञातांनी ३-४ राउंड फायर केले. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच, सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही २०२२ मध्ये घराबाहेर जॉगिंग करताना धमकीची चिठ्ठी देण्यात आली होती.
यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं म्हणत सलमानला मारण्याची धमी देण्यात आली होती. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती.